‘बेस्ट पॉलिटेक्निक प्राचार्य’ मोहन देशपांडेंना जाहीर नरेंद्र काटीकर : स्वामी विवेकानंद इन्स्टिट्यूटला उत्कृष्ट तंत्रनिकेतनचे नामांकन

By admin | Published: January 6, 2016 01:51 AM2016-01-06T01:51:15+5:302016-01-06T01:51:15+5:30

सोलापूर : इंडियन सोसायटी ऑफ टेक्निकल एज्युकेशन संस्थेच्या वतीने देण्यात येणारा ‘राष्ट्रीय बेस्ट पॉलिटेक्निक प्राचार्य’ पुरस्कार स्वामी विवेकानंद इन्स्टिट्यूटचे प्राचार्य प्रा. मोहन देशपांडे यांना जाहीर झाला आहे. तर आय.एस.टी.ई. दिल्लीचे उत्कृष्ट तंत्रनिकेतनचे नामांकन स्वामी विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (पॉलि) सोलापूरला मिळाले असल्याची माहिती आयएसटीईचे सोलापूर येथील नॅशनल गव्हर्नर कौन्सिलचे सदस्य प्रा. नरेंद्र काटीकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

'Best Polytechnic Principal' Mohan Deshpande Announces Narendra Katikar: Nomination for Best Polytechnic in Swami Vivekanand Institute | ‘बेस्ट पॉलिटेक्निक प्राचार्य’ मोहन देशपांडेंना जाहीर नरेंद्र काटीकर : स्वामी विवेकानंद इन्स्टिट्यूटला उत्कृष्ट तंत्रनिकेतनचे नामांकन

‘बेस्ट पॉलिटेक्निक प्राचार्य’ मोहन देशपांडेंना जाहीर नरेंद्र काटीकर : स्वामी विवेकानंद इन्स्टिट्यूटला उत्कृष्ट तंत्रनिकेतनचे नामांकन

Next
लापूर : इंडियन सोसायटी ऑफ टेक्निकल एज्युकेशन संस्थेच्या वतीने देण्यात येणारा ‘राष्ट्रीय बेस्ट पॉलिटेक्निक प्राचार्य’ पुरस्कार स्वामी विवेकानंद इन्स्टिट्यूटचे प्राचार्य प्रा. मोहन देशपांडे यांना जाहीर झाला आहे. तर आय.एस.टी.ई. दिल्लीचे उत्कृष्ट तंत्रनिकेतनचे नामांकन स्वामी विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (पॉलि) सोलापूरला मिळाले असल्याची माहिती आयएसटीईचे सोलापूर येथील नॅशनल गव्हर्नर कौन्सिलचे सदस्य प्रा. नरेंद्र काटीकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
आय.एस.टी.ई. ही व्यावसायिक संस्था तंत्रज्ञान क्षेत्रातील प्राध्यापकांसाठी 1968 पासून कार्यरत आहे. दरवर्षी राष्ट्रीय स्तरावर ‘राष्ट्रीय बेस्ट पॉलिटेक्निक प्राचार्य’ हा पुरस्कार देण्यात येतो. हा पुरस्कार रंगनाथ इंजिनिअरिंग कॉलेज कोईम्बतूर यांनी पुरस्कृत केला असून 6 हजार रुपये रोख, सन्मानपत्र व मानचिन्ह असे याचे स्वरूप आहे. हा पुरस्कार दि. 9 जानेवारी रोजी अमरावती येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत वितरित होणार आहे.
स्वामी विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (पॉलि) या संस्थेस आयएसटीई-नवी दिल्लीचा ‘नर्सी मोन्जी बेस्ट पॉलिटेक्निक अवॉर्ड इन महाराष्ट्र’ या पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे. हे नामांकन निवडक 6 तंत्रनिकेतन महाविद्यालयांना देण्यात आले आहे, असेही यावेळी प्रा. नरेंद्र काटीकर यांनी सांगितले. यावेळी प्राचार्य प्रा. मोहन देशपांडे, प्रा. हिंदुराव गोरे, प्रा. संतोष कांबळे, प्रा. दीपक कात्रे, जनसंपर्क अधिकारी आनंद सुरवसे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: 'Best Polytechnic Principal' Mohan Deshpande Announces Narendra Katikar: Nomination for Best Polytechnic in Swami Vivekanand Institute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.