मध्य प्रदेश, गुजरात, कर्नाटक यांना उत्कृष्ट पर्यटन विकासाचे पुरस्कार

By admin | Published: July 31, 2016 05:31 AM2016-07-31T05:31:58+5:302016-07-31T05:31:58+5:30

सर्वोत्कृष्ट पर्यटन विकासाचा २0१४-१५च्या पहिला पुरस्कार मध्य प्रदेश राज्याला मिळाला

Best Tourism Development Award for Madhya Pradesh, Gujarat and Karnataka | मध्य प्रदेश, गुजरात, कर्नाटक यांना उत्कृष्ट पर्यटन विकासाचे पुरस्कार

मध्य प्रदेश, गुजरात, कर्नाटक यांना उत्कृष्ट पर्यटन विकासाचे पुरस्कार

Next


नवी दिल्ली : सर्वोत्कृष्ट पर्यटन विकासाचा २0१४-१५च्या पहिला पुरस्कार मध्य प्रदेश राज्याला मिळाला असून, दुसऱ्या क्रमांकावर गुजरात आणि तिसऱ्या क्रमांकावर कर्नाटक आहे. केंद्रीय पर्यटन मंत्रालयातर्फे झालेल्या राष्ट्रीय पर्यटन पुरस्कार सोहळ्यात लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्या हस्ते शनिवारी हे पुरस्कार देण्यात आले. महाराष्ट्राला एकही पुरस्कार नसला तरी मुंबईच्या सहार येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाला सर्वोत्कृष्ट विमानतळाचा पर्यटन पुरस्कार मिळाला आहे.
राजस्थानातील सवाई माधोपूर स्थानकाची सर्वोत्कृष्ट पर्यटनस्नेही रेल्वे स्थानक म्हणून निवड झाली, तर तेलंगणामधील वारांगळची उत्कृष्ट हेरिटेज शहर म्हणून निवड झाली. मध्य प्रदेशला अमरकंटक या धार्मिक शहरातील ऐतिहासिक वास्तूंचे उत्कृष्ट जतन केल्याबद्दलचा पुरस्कार देण्यात आला आहे.
यंदाच्या पुरस्कारांमध्ये पर्यटन कंपन्या तसेच अनेक हॉटेल्स यांचीही निवड करण्यात आली आणि त्यांनाही पुरस्कार देण्यात आले. हॉटेलांमध्ये ताज एक्झोटिका (गोवा), फतेह प्रकाश पॅलेस (उदयपूर), कोकोनट कागून (कोट्टायम) आणि गजानन
पॅलेस (बिकानेर) यांचा समावेश
आहे. दिव्यांग पर्यटकांना उत्कृष्ट
सेवा पुरविल्याबद्दल दिल्लीच्या ललितची निवड करण्यात आली
आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
>पर्यटन व्यवसायाला प्रोत्साहन देण्याचे मोदी सरकारचे धोरण असल्याचे या वेळी केंद्रीय पर्यटनमंत्री महेश शर्मा यांनी सांगितले. पर्यटन व्यवसायातून देशात हजारो रोजगार उपलब्ध होतील आणि मोठ्या प्रमाणात परकीय चलनही भारताला मिळेल, असेही ते म्हणाले.
>किमान १ टक्का पर्यटक यावेत : जगभरात पर्यटनासाठी जितके पर्यटक जातात, त्यापैकी १ टक्काही पर्यटक भारतात येत नाहीत. त्यामुळे पर्यटन व्यवसायाच्या वाढीला भारतात खूप मोठा वाव आहे. त्यामुळे २0२0पर्यंत भारतात किमान १ टक्का पर्यटक यावेत आणि २0२५पर्यंत हे प्रमाण २ टक्के असावे, असे केंद्राचे प्रयत्न आहेत, असे पर्यटनमंत्र्यांनी नमूद केले. गेल्या वर्षी जानेवारी ते जून या काळात भारतात आलेल्या परदेशी पर्यटकांच्या तुलनेत यंदा याच काळात सुमारे ९ टक्क्यांनी वाढ झाली. यंदा ४१ लाख ८६ हजार परदेशी पर्यटक भारतात आले.
>परकीय चलन : गेल्या वर्षीपेक्षा पर्यटकांमुळे परकीय चलनात यंदा १४.१% वाढ झाली. यंदा जूनपर्यंत ७३,0६५ कोटी रुपये परकीय चलन मिळाले, असे महेश शर्मा म्हणाले.

Web Title: Best Tourism Development Award for Madhya Pradesh, Gujarat and Karnataka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.