हे कसलं अभियान? बेटी बचाओ बेटी पढाओच्या बजेटपैकी ७९ टक्के रक्कम जाहिरातींवर खर्च

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2021 01:54 PM2021-12-11T13:54:28+5:302021-12-11T13:54:46+5:30

अभियानासाठी देण्यात आलेला बहुतांश निधी जाहिरातींवर खर्च; संसदेसमोर अहवाल सादर

Beti Bachao Beti Padhao 78 91 percent funds given to states spent on advertising finds report | हे कसलं अभियान? बेटी बचाओ बेटी पढाओच्या बजेटपैकी ७९ टक्के रक्कम जाहिरातींवर खर्च

हे कसलं अभियान? बेटी बचाओ बेटी पढाओच्या बजेटपैकी ७९ टक्के रक्कम जाहिरातींवर खर्च

googlenewsNext

नवी दिल्ली: मोदी सरकारनं बेटी बचाओ-बेटी पढाओ योजनेसाठी देण्यात आलेली बहुतांश रक्कम केवळ जाहिरातींवर खर्च केली असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. योजनेसाठी देण्यात आलेल्या निधीपैकी ७९ टक्के रक्कम जाहिरातींवर खर्च करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. गुरुवारी संसदेत सादर करण्यात आलेल्या अहवालात ही आकडेवारी देण्यात आली आहे. 

२०१६ ते २०१९ या कालावधीत बचाओ-बेटी पढाओ योजनेसाठी ४४६.७२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. त्यापैकी ७८.९१ टक्के रक्कम मुलींच्या शिक्षण आणि आरोग्यावर खर्च करण्याऐवजी जाहिरातींवर खर्च केली गेली. बचाओ-बेटी पढाओचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी माध्यमांमध्ये अभियान राबवणं समितीला गरजेचं वाटतं असं समितीनं अहवालात नमूद केलं आहे. या समितीचं नेतृत्त्व भाजप खासदार हिना गावित यांच्याकडे आहे.

२०१६-१७ मध्ये अभियानावर अतिशय कमी खर्च करण्यात आल्याचं कॅगनं म्हटलं आहे. राज्यांच्या स्तरावर कामगिरी फारशी चांगली झालेली नसल्याचं म्हणत त्यांनी काही आकडेवारी दिली. २०१४-१५ आणि २०१९-२० च्या दरम्यान राज्यांनी केवळ १५६.४६ कोटी रुपयांचा वापर केला. या कालावधीत केंद्रानं राज्यांना ६५२ कोटी रुपये दिले होते. मात्र राज्यांनी केवळ २५.१३ टक्केच रक्कम वापरली.

Web Title: Beti Bachao Beti Padhao 78 91 percent funds given to states spent on advertising finds report

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.