धावत्या रेल्वेतून उतरणे बेतले जीवावर

By admin | Published: September 11, 2016 12:33 AM2016-09-11T00:33:56+5:302016-09-11T00:33:56+5:30

जळगाव : स्टेशन सुटल्यानंतर धावत्या रेल्वेतून उतरण्याचा प्रयत्न करत असताना सचिन साहेबराव धनगर (वय २४रा. मेहुणबारे, ता.चाळीसगाव) या तरुणाचा चौघुले प्लॉटनजिक रेल्वे लाईनवर पडल्याने मृत्यू झाला. दोन्ही पाय कापले गेल्याने अतिरक्तस्त्रावामुळे त्याचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी दुपारी घडली. दादर येथून काशी एक्सप्रेसने तो जळगाव येथे येत होता, मात्र डुलकी लागल्यामुळे त्याला उतरता आले नाही. जाग आली तेव्हा गाडी प्लॅटफार्मवरुन सुटली होती.

Betling with the running train | धावत्या रेल्वेतून उतरणे बेतले जीवावर

धावत्या रेल्वेतून उतरणे बेतले जीवावर

Next
गाव : स्टेशन सुटल्यानंतर धावत्या रेल्वेतून उतरण्याचा प्रयत्न करत असताना सचिन साहेबराव धनगर (वय २४रा. मेहुणबारे, ता.चाळीसगाव) या तरुणाचा चौघुले प्लॉटनजिक रेल्वे लाईनवर पडल्याने मृत्यू झाला. दोन्ही पाय कापले गेल्याने अतिरक्तस्त्रावामुळे त्याचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी दुपारी घडली. दादर येथून काशी एक्सप्रेसने तो जळगाव येथे येत होता, मात्र डुलकी लागल्यामुळे त्याला उतरता आले नाही. जाग आली तेव्हा गाडी प्लॅटफार्मवरुन सुटली होती.
सचिन हा मेहुणबारे परिसरासह चाळीसगाव तालुक्यात दुचाकीवर लहान मुलांचे रेडिमेड कपडे विक्री करण्याचा व्यवसाय करून कुटुंबाला हातभार लावत होता. हे कापडे घेण्यासाठी तो मुंबई (दादर) येथे गेला होता. तेथून परत येत असताना त्याला जळगाव रेल्वेस्थानकावर डुलकी लागल्याने तो गाडीतच होता. गाडी सुटल्याचे लक्षात आल्यावर धावत्या गाडीतून उतरण्याचा प्रयत्न करत असताना तो तोल जाऊन पडला, या घटनेत त्याच्या दोघा पायांना जबर दुखापत झाली.
दरम्यान, हा प्रकार लक्षात आल्यानंतर नागरिकांनी त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले.परंतु तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर लोहमार्गचे अजय मून, गोपाल सोळंके,महेश सेन यांनी घटनास्थळी जाऊन रूग्णालयात धाव घेतली. घटनेनंतर जखमीची लगेच ओळख पटली नाही. त्याच्या खिशात सापडलेले पाकिट, आणि लायसन्स यावरून तो मेहुणबारा येथील असल्याचे निष्पन्न झाले. याचवेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष योगेश देसले यांनी मेहुणबारे येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशी संपर्क करुन सचिन धनगर बाबत माहिती दिली. त्यानुसार नातेवाईकांना माहिती मिळाल्यावर नातेवाईक सायंकाळी सिव्हीलमध्ये पोहोचले.
मयत सचिनच्या खिशात पोलिसांना ९ हजार ६३० रूपयांची रोकड, दुचाकीची चाबी,मिनी पाकीट, लायसन्स, मोबाईल हॅण्डसेट, पेन आदी वस्तू आढळून आल्या. पोलिसांनी सायंकाळी पंचनामा केला. दरम्यान, सचिनचा अकस्मात मृत्यू वयोवृध्द आईवडीलांना जबर मानसिक देणारा ठरला. सायंकाळी युवकाच्या मृतदेहावर शवविच्छेदन करण्यात येऊन शव नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.

Web Title: Betling with the running train

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.