Indian Army: भारतीय सैन्याशी विश्वासघात! पाकिस्तानात पळालेला खबरीच करतोय ड्रोन हल्ले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2021 06:15 PM2021-08-17T18:15:56+5:302021-08-17T18:16:26+5:30

Indian Army news: जम्मू काश्मीरसह पंजाबमध्ये गेल्या काही दिवसांपासून ड्रोनद्वारे बॉम्ब (Drone Attack) टाकण्याचे हल्ले वाढले आहेत. हे हल्ले पाकिस्तानमधून होत आहेत.

Betrayal of Indian Army! Drone attacks done by Ashik Ahmad naigaru in Jammu kashmir | Indian Army: भारतीय सैन्याशी विश्वासघात! पाकिस्तानात पळालेला खबरीच करतोय ड्रोन हल्ले

Indian Army: भारतीय सैन्याशी विश्वासघात! पाकिस्तानात पळालेला खबरीच करतोय ड्रोन हल्ले

googlenewsNext

जम्मू काश्मीरसह पंजाबमध्ये गेल्या काही दिवसांपासून ड्रोनद्वारे बॉम्ब (Drone Attack) टाकण्याचे हल्ले वाढले आहेत. हे हल्ले पाकिस्तानमधून (Pakistan) होत असून धक्कादायक बाब म्हणजे जैशचा कमांडर आशिक अहमद नैगरू हे हल्ले करत असल्याचे समोर आले आहे. ही माहिती अधिकृत नसली तरी देखील सैन्याला मिळालेल्या पुराव्यांवरून यामागे नैगरूचाच हात असल्याचे समोर येत आहे. (Who is doing Drone Attack in Jammu Kashmir; Indian Army got information from arrested terrorist.)

नैगरू हा 2019 मध्ये सांबा बॉर्डरवरून पाकिस्तानला गेला होता. यासाठी त्याची मदत हिदायत उल्लाह आणि यासिर यांनी केली होती. तो काश्मीरहून त्याच्या नातेवाईकांसोबत एका कारमधून आला होता. तेथून त्याला पाकिस्तानात पाठविण्यात आले. तेव्हापासून तो दहशतवादी भरती आणि संघटन करण्याच्या कामी लागला आहे. गंग्यालमध्ये ताब्यात घेण्यात आलेल्या चार जैशच्या दहशतवाद्यांनी ही माहिती दिली आहे. 

धक्कादायक म्हणजे, आशिक हा भारतीय सैन्य दलासाठी खबऱ्याचे काम करत होता. तो ट्रक चालक होता. मात्र, नंतर तो जैशचा सक्रीय दहशतवादी बनला. काश्मीरमध्ये नाव मिळविल्यानंतर त्याला जेव्हा धोक्याचे वाटू लागले तेव्हा तो पाकिस्तानला पळून गेला. गंग्याल पोलिसांनी ज्या चार दहशतवाद्यांना अटक केली त्यांच्यापैकी दोघांना तुरुंगात पाठविण्यात आले आहे. तर उर्वरितांपैकी एक जेआयसी आणि दुसरा पोलीस ठाण्याच्या कोठडीत आहे. तजर मंजूर उर्फ सैफउल्ला, इजाहर खान उर्फ सोनू खान, तोसीफ अहमद शाह उर्फ शौकत आणि जागिर अहमद बट अशी त्यांची नावे आहेत. 

जागिर अहमद ने अनेक खुलासे केले आहेत. त्याने याआधीही दहशतवाद्यासोबत मिळून कारवाया केल्या आहेत. झज्जरकोटली येथील चकमकीवेळी त्याच्या अल्टो कारचा वापर झाला होता. दहशतवाद्यांच्या कारच्या पुढे रेकी करण्यासाठी त्याची कार वापरण्यात आली होती. ही कार नैगरूचा भाऊ चालवत होता. त्यालाही नंतर अटक करण्यात आली होती. नैगरूने याच कारचा वापर पाकिस्तानात जाण्यापूर्वी केला होता. 

Web Title: Betrayal of Indian Army! Drone attacks done by Ashik Ahmad naigaru in Jammu kashmir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.