सावधान! असाही चोरला जातो तुमचा ओटीपी; धक्कादायक माहिती समोर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2022 05:49 AM2022-10-16T05:49:13+5:302022-10-16T05:49:56+5:30
ओटीपी क्रमांकाशिवाय तुमचा ऑनलाइन किंवा यूपीआयद्वारे व्यवहार पूर्ण होत नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली: ऑनलाइन किंवा यूपीआयद्वारे व्यवहार करणाऱ्यांसाठी वन टाइम पासवर्ड अर्थात ओटीपी सर्वात महत्त्वाचा असतो. ओटीपी क्रमांकाशिवाय तुमचा व्यवहार पूर्ण होत नाही. पण हा क्रमांक सायबर भामटे तुम्हाला फोन करूनही मिळवू शकता, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
केंद्र सरकारच्या प्रेस इन्फॉर्मेशन ब्यूरोने (पीआयबी) याबाबत एक व्हिडिओ जारी करून सतर्कतेचा इशारा दिला आहे. “फोनवर अनोळखी व्यक्तीशी बोलत असताना इतर कोणताही कॉल कधीही जोडू नका. जर एकदा तुम्ही कॉल मर्ज केला तर भामटे तुमचा ओटीपी सहज मिळवू शकता आणि तुमचे सोशल मीडिया खाते हॅक करू शकता’, अशा इशारा पीआयबीने दिला आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"