चोरट्यांचेही वर्क फ्रॉम होम, या वेबसाईटपासून राहा सावधान
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2020 06:08 AM2020-04-14T06:08:47+5:302020-04-14T06:08:54+5:30
सायबर गुन्हेगारांकडून अनेक जण लक्ष्य
नवी दिल्ली : लॉकडाऊनच्या काळात नागरिकांना ‘वर्क फ्रॉम होम’चे आवाहन सरकारने केल्यानंतर आता सायबर गुन्हेगारांनीही घरूनच काम करणे सुरू केले आहे. पंतप्रधान मदत निधीचा बनावट यूपीआय आयडी बनविण्यासह नागरिकांना सोशल मीडियाद्वारे गंडा घालण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी अधिक सतर्क राहावे, असे आवाहन दिल्ली सायबर क्राईम पोलिसांनी केले आहे.
सायबर चोरट्यांनी सर्वप्रथम या निधीकडे लक्ष वळविले आणि बनावट यूपीआय आयडी तयार केला. त्याद्वारे दात्यांकडील निधी चोरट्यांच्या खात्यात जमा होत असल्याची तक्रार विश्वेश कुमार झा या युवकाने सायबर पोलिसांना केली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने हा यूपीआय आयडी ब्लॉक केला असून संबंधिताचा शोध सुरू आहे. स्पायमॅक्स, कोरोना लाईव्ह या अॅपद्वारे मालवेअर पसरवीत आहेत. त्याद्वारे ही लिंक उघडणाऱ्या कॉम्प्युटर किंवा मोबाईलचा सर्व डेटा चोरटे मिळवीत आहेत. तसेच, फोनपे, अॅमेझॉन, गुगल पे अशा विविध आॅनलाईन सुविधा देणाºया अॅप्सलाही चोरट्यांनी लक्ष्य केले आहे.
या वेबसाईटपासून राहा सावधान
झूम वापरतानाही
च्सध्या वर्क फ्रॉम होम सुरू असल्याने मीटिंगसाठी झूम हे अॅप वापरले जात आहे. त्याचा वापरही सावधानतेने करावा. मीटिंगची लिंक सोशल मीडियात टाकू नये, असे पोलिसांनी सांगितले
चोरट्यांद्वारे एक लिंक मेसेजद्वारे पाठविली जाते. कॅशबॅकचा लाभ मिळणारआहे. त्यासाठी ती लिंक उघडून आपला यूपीआय आयडी टाका, असे सांगितले जात आहे. नागरिकांनी ते करताच खात्यातील रक्कम चोरटे हडप करीत आहेत.