भरधाव दुचाकीने घेतला पाटबंधारे कर्मचार्याचा बळी काव्यरत्नावली चौकातील घटना: दोन दिवसापासून सुरू होती मृत्यूशी झुंज
By admin | Published: October 30, 2016 12:18 AM2016-10-30T00:18:17+5:302016-10-30T00:18:17+5:30
जळगाव : रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगाने आलेल्या दुचाकीने उडविल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या प्रल्हाद न्हानू श्रीखंडे (वय ५३ मूळ रा.चिंचोल, ता.मुक्ताईनगर ह.मु.गिरणा कॉलनी, जळगाव) यांचा शनिवारी दुपारी साडे तीन वाजता उपचार सुरू असताना मृत्यू झाला. श्रीखंडे हे पाटबंधारे विभागात नोकरीला होते.
Next
ज गाव : रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगाने आलेल्या दुचाकीने उडविल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या प्रल्हाद न्हानू श्रीखंडे (वय ५३ मूळ रा.चिंचोल, ता.मुक्ताईनगर ह.मु.गिरणा कॉलनी, जळगाव) यांचा शनिवारी दुपारी साडे तीन वाजता उपचार सुरू असताना मृत्यू झाला. श्रीखंडे हे पाटबंधारे विभागात नोकरीला होते.श्रीखंडे हे गुरुवारी संध्याकाळी ड्युटीवरून आल्यानंतर काव्यरत्नावली चौक परिसरात फिरायला गेले असता साडे सात वाजता रस्ता ओलांडत असताना महाबळ कॉलनीकडून काव्यरत्नावली चौकाकडे दुचाकीने (क्र.एम.एच.१९ सी.एल ४२५७) भरधाव वेगाने येणार्या बिलाल हुसेन पिंजारी (रा.समता नगर, जळगाव) याने जोरदार धडक दिली. त्यात ते लांब फेकले जाऊन उजव्या पायास व डोक्यात जबर मार बसला. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात हलविण्यात आले होते. तेथे दोन दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर शनिवारी दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. श्रीखंडे यांच्या मृत्यूची माहिती मिळताच पाटबंधारे विभागाचे तत्कालीन अधीक्षक तथा नागपूर विभागाचे माहिती आयुक्त व्ही.डी.पाटील यांच्यासह अधिकार्यांनी रुग्णालयात धाव घेतली.मूळ गावी अंत्यसंस्कारमृतदेह खासगी रुग्णालयातून सरकारी रुग्णालयात आणण्यात आला. शवविच्छेदन झाल्यानंतर संध्याकाळी त्यांच्या मूळ गावी चिंचोल येथे नेऊन तेथे अंत्यसंस्कार करण्यात आले. श्रीखंडे यांच्या पात पत्नी,दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे. मुलगी विवाहित असून मुंबई येथे वास्तव्याला आहे. दरम्यान, या अपघातप्रकरणी दुचाकीस्वाराविरुध्द रामानंद नगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सुसाट वाहने उठली जिवावरशहरात भरधाव वेगाने दुचाकी व चार चाकी चालविण्याचे प्रकार वाढले आहेत. महाबळ रोड व रिंग रोड या दोन रस्त्यावर हा प्रकार जास्त चालतो. रात्री दहा वाजेनंतर तर बड्या घराण्यातील मुले मद्याच्या नशेत वाहन चालवतांना पोलिसांनी पकडले आहेत. दोन दिवसापूर्वीच एका तरुणाची दुचाकी जप्त करून त्याच्या पालकांसह पोलीव अधीक्षक यांच्या समोर हजर करण्यात आले होते. मुजोर तरुणांची हौस असली तरी त्यात निष्पाप नागरिकांचा जीव जात आहे. श्रीखंडे हे त्याचाच बळी ठरले आहेत.