जिथे दोनवेळा कोसळला पुल, तेथील इंजिनिअरच्या घरात सापडलं घबाड, दागदागिने, रोकड आणि...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2023 09:25 AM2023-07-27T09:25:26+5:302023-07-27T09:25:54+5:30

Bihar News: बिहारमधील पुल निर्माण निगमचे एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरच्या घरी व्हिजिलेंसच्या टिमने घातलेल्या धाडीत घबाड सापडले आहे. लाखो रुपयांची रोख रक्कम, दागदागिने आणि जमिनीचे कागद जप्त करण्यात आले आहेत.

bhagalpur bridge collapsed: Where the bridge collapsed twice, money, jewellery, cash and... | जिथे दोनवेळा कोसळला पुल, तेथील इंजिनिअरच्या घरात सापडलं घबाड, दागदागिने, रोकड आणि...

जिथे दोनवेळा कोसळला पुल, तेथील इंजिनिअरच्या घरात सापडलं घबाड, दागदागिने, रोकड आणि...

googlenewsNext

बिहारमधील पुल निर्माण निगमचे एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरच्या घरी व्हिजिलेंसच्या टिमने घातलेल्या धाडीत घबाड सापडले आहे. लाखो रुपयांची रोख रक्कम, दागदागिने आणि जमिनीचे कागद जप्त करण्यात आले आहेत. यादरम्यान, पोलिसांनी उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती जमा केल्या प्रकरणी एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरला अटक केली आहे. भागलपूरमध्ये गंगा नदीवर खगडिया-अगुवानी-सुल्तानगंजदरम्यान पूल बांधण्यात येत होते. हे पुल दोनवेळा कोसळले होते. याचा व्हिडीओसुद्धा व्हायरल झाला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, भागलपूरच्या जोकसर पोलीस ठाण्याच्या क्षेत्रामध्ये हनुमाननगर कॉलनीमध्ये राहणाऱ्या श्रीकांत शर्मा यांच्या निवासस्थानी व्हिजिलेंसच्या टिमने छापेमारी केली होती. श्रीकांत शर्मा शर्मा बिहार राज्य पुल निर्माण निगममध्ये एक्झिक्युटिव्ह इंजिनियअर होते. त्यांच्या घरातून ८० लाख रुपयांची रोख रक्कम, लाखो रुपयांची रोख रक्कम, लाखो रुपयांचे दागदागिने आणि जमिनीची अनेक कागदपत्रे जप्त केली आहेत.

इंजिनियरच्या घरातून एका ब्रिफकेसमध्ये नोटांनी भरलेलं बंडल मिळालं आहे. व्हिजिलेंन्सच्या टिमने उत्पन्नाच्या ज्ञात स्रोतांपेक्षा अधिक संपत्ती जमा केल्याने इंजिनिअरला अटक करण्यात आली आहे. आता यंत्रणांकडून त्यांच्याकडील बेकायदेशीर मालमत्तेसह कागदपत्रांचा शोध सुरू केला आहे. 

Web Title: bhagalpur bridge collapsed: Where the bridge collapsed twice, money, jewellery, cash and...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.