दिल्लीच्या राजपथावर भगवा फडकला! महाराष्ट्राच्या चित्ररथाला प्रथम क्रमांक मिळाल्याची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2018 09:51 PM2018-01-27T21:51:05+5:302018-01-27T22:19:16+5:30

दिल्लीच्या राजपथावर भगवा फडकला आहे. प्रजासत्ताक दिनी राजपथावर अवतरलेल्या महाराष्ट्राच्या चित्ररथाला प्रथम क्रमांक मिळाला आहे.

Bhagwa Phadkala on the Rajpath of Delhi, the number one in the painting of Maharashtra | दिल्लीच्या राजपथावर भगवा फडकला! महाराष्ट्राच्या चित्ररथाला प्रथम क्रमांक मिळाल्याची माहिती

दिल्लीच्या राजपथावर भगवा फडकला! महाराष्ट्राच्या चित्ररथाला प्रथम क्रमांक मिळाल्याची माहिती

googlenewsNext

नवी दिल्ली- दिल्लीच्या राजपथावर भगवा फडकला आहे. प्रजासत्ताक दिनी दिल्लीच्या राजपथावर अवतरलेल्या महाराष्ट्राच्या चित्ररथाला प्रथम क्रमांक मिळाला आहे. यासंदर्भातील कुठलीही अधिकृत घोषणा झाली नसून उद्यापर्यंत यासंदर्भातील अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. एबीपी माझा या वृत्तवाहिनीने सुत्रांच्या आधारे यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी हा चित्ररथ साकारला होता. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याचा चित्ररथ मोठ्या दिमाखात राजपथावर उतरला होता. त्याचाच गौरव झाला असून महाराष्ट्राच्या चित्ररथाने प्रथन क्रमांक पटकाविला आहे. चित्ररथांमध्ये आसामने दुसरा तर छत्तीसगडने तिसरा क्रमांक पटकाविला आहे. 

चित्ररथाच्या माध्यमातून शिवाजी महाराजांचा राज्यभिषेक सोहळा देशाने अनुभवला. ‘तेज तम अंस पर । कान्ह जिमि कंस पर। त्यों मलिच्छ बंस पर । सेर सिवराज है । या कविराज भूषण यांच्या वीररसाने भरलेल्या काव्याचा उद्घोष करत शिवरायांची किर्ती सांगणारा चित्ररथ राजपथावर उतरला होता. 

महाराष्ट्राच्या चित्ररथातील कवी भूषण यांचं हे काव्य अजय-अतुलने संगीतबद्ध केलेलं आहे. ज्या दिल्लीने छत्रपतींच्या स्वराज्याला कायम कमी लेखलं, ज्या दिल्लीश्वरांशी झगडण्यात शिवरायांचं आयुष्य खर्ची पडलं त्याच दिल्लीच्या मातीत अनेक राष्ट्रप्रमुखांच्या उपस्थितीत छत्रपतींच्या पराक्रमाची कीर्ती सांगणारा हा चित्ररथ दिमाखात अवतरला.

चित्ररथाच्या सुरुवातीला किल्ल्याची प्रतिकृती होती त्यावर मधोमध शिवरायांची अश्वारुढ प्रतिकृती दर्शवण्यात आलेली आहे. तर मध्यभागी रायगडाची प्रतिकृती असून त्या ठिकाणच्या मेघडंबरीत सिंहासनावर छत्रपती शिवराय विराजमान झालेले दाखवले. या ठिकाणी आभूषण देणारा दरबारी, त्याच्या शेजारी गागाभट्ट, तर या राज्याभिषेकासाठी उपस्थित असलेला इंग्रज अधिकारी सर हेन्री ऑक्सिजन दाखवले. 
दरबारात छत्रपती शिवरायांच्या शेजारी बसलेल्या सोयराबाई आणि संभाजीराजे दाखवण्यात आले आहेत. चित्ररथाच्या मागच्या भागात आसनस्थ असलेल्या राजमाता जिजाऊ दर्शवण्यात आल्या आहेत. या चित्ररथाची संकल्पना ज्येष्ठ कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी सादर केली आहे.

Web Title: Bhagwa Phadkala on the Rajpath of Delhi, the number one in the painting of Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.