Bhagwant Maan: CM पदाची शपथ घेताच भगवंत मान यांचा 'आप'ल्या आमदारांना मोलाचा सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2022 02:36 PM2022-03-16T14:36:28+5:302022-03-16T16:13:57+5:30
Bhagwant Maan: भगवंत मान यांनी शहीद भगतसिंह यांच्या जन्मभूमीत मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यावेळी, इश्क करना है तो वतन से करो... असे म्हणत देशभक्तीपर शायरीही ठोकली.
चंदीगड - आम आदमी पक्षाचे नेते (AAP) भगवंत मान (Bhagwant Maan) पंजाबचे 17 वे मुख्यमंत्री बनले आहेत. आज भगवंत मान यांनी शहीद भगतसिंग यांचे गाव खटखड कलां येथे पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल बनवारी लाल पुरोहित यांनी मान यांना गोपनियतेची शपथ दिली. यावेळी मंचावर आपचे संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यासह आपचे अनेक नेते उपस्थित होते. यावेळी, मान यांनी त्यांच्या स्टाईलने भाषण केले. तसेच, नवनिर्वाचित आमदारांना काही सूचनाही केल्या.
Punjab | "Ishq karna sabka paidaishi haq hai kyun na is baar watan ki sarzamin ko mehboob bana liya jaye," says Punjab's new Chief Minister Bhagwant Mann quoting Bhagat Singh after taking oath pic.twitter.com/mWdP6j74Je
— ANI (@ANI) March 16, 2022
भगवंत मान यांनी शहीद भगतसिंह यांच्या जन्मभूमीत मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यावेळी, इश्क करना है तो वतन से करो... असे म्हणत देशभक्तीपर शायरीही ठोकली. इश्क करना सबका पैदाईशी हक है, क्यूं ना इस बार वतन की सरजमीं को मेहबुब बना लिया जाए.. असे त्यांनी म्हटले. तसेच, नवनिर्वाचित सर्वच आमदारांना मी आवाहन करतो की, सर्वांचा आदर करा, अरोगंट होऊ नका. ज्यांनी आपणास मतदान केलं नाही, त्यांच्याशीही आदराने वागा, असा सल्लाच नवनिर्वाचित मुख्यमंत्र्यांनी आपच्या सर्वच आमदारांना दिला.
I appeal to you all ( newly-elected MLAs) to not get arrogant. We have to respect even those who didn't vote for us. I thank you all & AAP convenor Arvind Kejriwal: Punjab CM Bhagwant Mann pic.twitter.com/nuGeOq0LjA
— ANI (@ANI) March 16, 2022
भगवंत मान यांचा हा भव्य शपथविधी सोहळा 100 एकराच्या परिसरात झाला. यातील 44 एकरवर मंडप उभारण्यात आला होता. या शपथविधी सोहळ्याला सुमारे 3 ते 4 लाख लोक उपस्थित होते. या सोहळ्यात 50 हजार लोकांच्या बसण्याची सोय केली होती, तर उर्वरित ठिकाणी एलईडी बसविण्यात येणार होते. सोहळ्याच्या सुरक्षेसाठी आठ हजार पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले.
पंजाब निवडणुकीत 'आप'ने 92 जागा जिंकल्या
पंजाब विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने मोठा विजय मिळवला आणि दोन तृतीयांश बहुमताने सत्ता स्थापन केली. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निकालांनुसार, आम आदमी पक्षाने पंजाबमध्ये 117 जागांपैकी 92 जागा जिंकल्या, तर काँग्रेसला केवळ 18 जागा जिंकता आल्या. शिरोमणी अकाली दल तीन जागा आणि भाजपने दोन जागा जिंकल्या, तर बसपने एक जागा जिंकली आणि अपक्षांनीही एक जागा जिंकली.
विनोदी कलाकार ते मुख्यमंत्री
भगवंत मान यांच्या करिअरची सुरुवात कॉमेडियन म्हणून झाली होती. त्यांनी 2008 मध्ये कपिल शर्मासोबत 'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज' या टीव्ही शोमध्ये भाग घेतला होता. त्या शोमधून भगवंत मान यांना खूप प्रसिद्धी मिळाली. कॉमेडीसोबतच भगवंत यांना अभिनयातही खूप रस होता. त्यांनी अनेक चित्रपटातही काम केले आहे.