सरकारचा अर्थ काय? भगवंत मान यांचा 'हा' व्हिडिओ पाहून तुम्हाला हसू आवरता येणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2022 11:05 AM2022-03-12T11:05:38+5:302022-03-12T11:06:43+5:30

Bhagwant Mann : भगवंत मान यांचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ते राजकारण आणि सरकारचा अर्थ सांगताना दिसत आहेत.

bhagwant mann viral video on what is govt punjab assembly election 2022 | सरकारचा अर्थ काय? भगवंत मान यांचा 'हा' व्हिडिओ पाहून तुम्हाला हसू आवरता येणार नाही

सरकारचा अर्थ काय? भगवंत मान यांचा 'हा' व्हिडिओ पाहून तुम्हाला हसू आवरता येणार नाही

Next

नवी दिल्ली : पंजाब विधानसभेच्या निवडणुकीत (Punjab Assembly Election) आम आदमी पार्टीला (AAP)प्रचंड बहुमत मिळाले आहे. आम आदमी पार्टीचे नेते भगवंत मान (Bhagwant Mann) 16 मार्च रोजी पंजाबच्या (Punjab) मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.  यापूर्वी 13 मार्च रोजी आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल आणि भगवंत मान अमृतसरमध्ये रोड शो करणार आहेत. 

दरम्यान, भगवंत मान यांचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ते राजकारण आणि सरकारचा अर्थ सांगताना दिसत आहेत. भगवंत मान राजकारणात येण्यापूर्वी विनोदी कलाकार होते. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये भगवंत मान यांच्यासोबत नवज्योत सिंग सिद्धूही दिसत आहेत. भगवंत मान यांच्या विनोदावर नवज्योत सिंग सिद्धू हसताना दिसत आहे.

भगवंत मान यांनी असा सांगितला सरकारचा अर्थ...
दरम्यान, हा व्हायरल व्हिडिओ द ग्रेट लाफ्टर चॅलेंज शोमधील आहे. या व्हिडिओमध्ये भगवंत मान स्टँडअप कॉमेडी करत आहेत. यामध्ये भगवंत मान यांनी म्हटले आहे की, "मी एका नेत्याला विचारले की, साहेब, हे काय राजकारण आहे, तेव्हा त्यांनी सांगितले की, राजकारण म्हणजे राज्य कसे करायचे याचे धोरण बनवत राहणे. मग मी त्यांना विचारले की हे राजकारण आहे तर सरकारचा अर्थ काय, तर त्यांनी सांगितले की प्रत्येक मुद्द्यावर विचार करून 1 मिनिटानंतर विसरणे याला सरकार म्हणतात"

निवडणुकीत दिग्गजांचा पराभव
या व्हायरल व्हिडिओवर सोशल मीडिया यूजर्सनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका ट्विटर युजरने लिहिले की मला वाटते की स्टँडअप कॉमेडीमध्ये भविष्य उज्ज्वल आहे, जसे आपण युक्रेनमध्ये पाहिले आहे. दरम्यान, पंजाब विधानसभेच्या निवडणुकीपूर्वीच आम आदमी पार्टीने भगवंत मान यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून घोषित केले होते. पंजाब विधानसभेच्या निवडणुकीत आम आदमी पार्टीने 117 पैकी 92 जागा जिंकल्या आहेत. या निवडणुकीत मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी, नवज्योतसिंग सिद्धू, प्रकाशसिंग बादल आणि अमरिंदर सिंग यांच्यासह अनेक दिग्गजांचा आम आदमी पार्टीच्या उमेदवारांकडून पराभव झाला आहे.
 

Web Title: bhagwant mann viral video on what is govt punjab assembly election 2022

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.