भागवत हेच मोदी सरकारचे ‘बॉस’

By admin | Published: September 3, 2015 10:13 PM2015-09-03T22:13:39+5:302015-09-03T22:13:39+5:30

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हेच केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारचे खरे ‘बॉस’ आहेत, असे काँग्रेसचे नेते मनीष तिवारी यांनी म्हटले आहे.

Bhagwat is the 'boss' of Modi government | भागवत हेच मोदी सरकारचे ‘बॉस’

भागवत हेच मोदी सरकारचे ‘बॉस’

Next

नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हेच केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारचे खरे ‘बॉस’ आहेत, असे काँग्रेसचे नेते मनीष तिवारी यांनी म्हटले आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील रालोआ सरकार हे भारतीय कॉर्पोरेट आणि रा. स्व. संघाच्या हातातील बाहुले आहे, असा आरोप करून तिवारी यांनी संघ-भाजपा समन्वय बैठकीवर हल्लाबोल केला.
नरेंद्र मोदी हे भारताचे पंतप्रधान असतील, पण खरे बॉस मात्र मोहन भागवत हेच आहेत. मोदी सरकार हे दोन तारांवर नाचणाऱ्या बाहुल्यासारखे आहे. एक तार रा. स्व. संघाद्वारे नियंत्रित केली जाणारी सामाजिक-सांस्कृतिक-शैक्षणिक तार आहे तर दुसरी भारताच्या कॉर्पोरेटद्वारे नियंत्रित केली जाणारी आर्थिक तार आहे. एकप्रकारे मोदी सरकारचा रिमोट कंट्रोल संघाच्या हातात आहे. मोदी केवळ बाहुले बनून काम करीत आहेत. भागवत हेच सत्ताकेंद्र आहेत आणि सत्तेच्या सर्व शक्ती त्यांच्याच ताब्यात आहेत. त्यामुळेच सरकारचे बडे मंत्री सरसंघचालकांना रिपोर्ट करीत आहेत, असे तिवारी म्हणाले.
दरम्यान, मोदी मंत्रिमंडळातील सदस्य रा.स्व. संघाच्या बड्या नेत्यांसमोर आपापले रिपोर्ट कार्ड सादर करीत आहेत. त्यामुळे आपण देशाच्या जनतेप्रती जबाबदार आहोत की संघाप्रती हे मोदी सरकारने स्पष्ट केले पाहिजे, असे काँग्रेसचे प्रवक्ते आर.पी. एन. सिंग यांनी म्हटले आहे.

Web Title: Bhagwat is the 'boss' of Modi government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.