भगत सिंग, सुखदेव, राजगुरूंना मोदींनी वाहिली श्रद्धांजली
By admin | Published: March 23, 2015 12:13 PM2015-03-23T12:13:37+5:302015-03-23T14:10:19+5:30
देशाच्या स्वातंत्र्यासाठी हसत हसत प्राणांची आहुती देणारे शहीद भगतसिंग, सुखदेव व राजगुरू यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी श्रद्धांजली वाहिली
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २३ - देशाच्या स्वातंत्र्यासाठी हसत हसत प्राणांची आहुती देणारे शहीद भगतसिंग, सुखदेव व राजगुरू यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी श्रद्धांजली वाहिली. 'देशासाठी प्राणांचे बलिदान देणा-या भगतसिंग, सुखदेव, राजगुरूंना माझे शत प्रणाम. या तिन्ही देशभक्तांना मी श्रद्धांजली वाहतो', असे ट्विट त्यांनी केले आहे. दरम्यान आज ते पंजाबच्या दौ-यावरही जाणार असून भगत सिंग, सुखदेव व राजगुरू यांच्यावर ज्या हुसैनीवाला गावात अंत्यसंस्कार करण्यात आले त्या गावाला मोदी भेट देणार आहेत. तसेच सुवर्ण मंदिर व जालियानवाला बाग येथेही पंतप्रधान जाणार असून त्या पार्श्वभूमीवर कडेकोट सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
अण्णा हजारेंनीही वाहिली भगतसिंगना श्रद्धांजली
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनीही आज भगतसिंग, सुखदेव व राजगुरूंना श्रद्धांजली वाहिली, यावेळी त्यांचे डोळे पाणावले होते. खटरकला गावात जाऊन अण्णा भगत सिंग यांना श्रद्धांजली अर्पण करत असताना त्यांच्या भावना अनावर झाल्या आणि त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले.
दरम्यान यावेळी अण्णांनी केंद्र सरकारवर कडाडून टीका केली. सरकारने लोकांना दिलेले वचन पाळले नाही. निवडणुकीपूर्वी त्यांनी जनतेला काळा पैसा परत आणण्याचे आश्वासन दिले होते, मात्र सरकार सत्तेवर येऊन दहा महिने उलटून गेले तरी एक पैसाही परत आला नसल्याचे सांगत सरकारने जनतेचा विश्वासघात केल्याची टीका अण्णांनी केली.