अंधश्रद्धेच्या विळख्यात अडकले होते भय्यू महाराज? 20 मिनिटं विचार करून झाडली गोळी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2018 03:28 PM2018-06-20T15:28:36+5:302018-06-20T15:28:36+5:30
भय्यू महाराज यांच्या आत्महत्येबद्दल धक्कादायक माहिती समोर येत आहे.
इंदूर- मध्य प्रदेश सरकारकडून राज्यमंत्रिपदाचा दर्जा मिळालेले अध्यात्मिक गुरू भय्यू महाराज यांनी 12 जून रोजी आत्महत्या केली. भय्यू महाराज यांच्या आत्महत्येनंतर त्यांचे भक्त, कुटुंबीय सगळ्यांनीच आत्महत्येबद्दल प्रश्नचिन्हं उपस्थित केलं. नेहमी शांत असणारे भय्यू महाराज आत्महत्या का करतील? असा प्रश्न प्रत्येकालाच पडला आहे. दरम्यान, या सगळ्या चर्चांनंतर भय्यू महाराज यांच्या आत्महत्येबद्दल धक्कादायक माहिती समोर येत आहे. भय्यू महाराज अंधश्रद्धेच्या विळख्यात अकडले होते. दैनिक भास्करच्या वृत्तानुसार, आत्महत्येपूर्वी काही दिवस भय्यू महाराज प्रचंड तणावात होते. त्यांच्या शरिरात थकवा होता. या थकव्याला त्यांनी एक विकार मानलं होतं. हा विकार दूर करण्यासाठी त्यांनी चित्तौडगड (राजस्थान)मधील जादुटोणा करणारा बाबा मोहम्मद उर्फ बाबा साहब नावाच्या एका बाबाचा आसरा घेतला होता. याबद्दलची माहिती भय्यू महाराज यांच्या जवळच्या व्यक्तींनाही नव्हती. मोबाइल वर तो बाबा आणि भय्यू महाराज बोलायचे. जेव्हा राजस्थानमधील तो बाबा मध्य प्रदेशला यायचा तेव्हा एका बंद खोलीत ते भेटायचे. एका वर्षात दोन वेळा भय्यू महाराज व तो बाबा भेटले होते. त्यावेळी तणावत असल्याचं भय्यू महाराज यांनी त्या बाबाला सांगितलं होतं. दरम्यान, तणावाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचं भय्यू महाराज यांनी सुसाइड नोटमध्ये म्हटलं होतं.
मंगळवारी भय्यू महाराज यांच्या आत्महत्येशी संबधीत फॉरेन्सिक रिपोर्टही समोर आली. रिपोर्टनुसार, भय्यू महाराज यांनी 15 ते 20 मिनिट विचार करून स्वतःवर गोळी झाडली. दरम्यान, भय्यू महाराज आर्थिक संकटांचा सामना करत होते. त्यांनी 10 लाख रूपये कर्जही घेतलं होतं. काही व्यवसायिक व आश्रमात येणाऱ्या प्रसिद्ध गायिकेकडूनही त्यांनी पैसे घेतल्याचं काही मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटलं गेलं आहे.