भय्यू महाराज यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 09:11 AM2018-06-13T09:11:50+5:302018-06-13T09:15:32+5:30
दुपारी दीड वाजता अंतिम यात्रेला सुरुवात होणार आहे.
इंदूर- प्रसिद्ध अध्यात्मिक गुरू भय्यू महाराज यांच्या पार्थिवावर बुधवारी इंदूर येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यांनी काल (मंगळवारी) स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली होती. त्यांच्या आत्महत्येने सामाजिक व राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती.
आत्महत्येच्या तासभरआधी भय्यू महाराजांनी लागोपाठ केली होती 5 ट्विट
आज त्यांना अखेरचा निरोप देण्यात येईल. अनुयायांना सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत सुर्योद्य आश्रमात भय्यू महाराज यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेता येईल. दुपारी दीड वाजता अंतिम यात्रेला सुरुवात होणार आहे. त्यानंतर अडीच वाजता इंदूरमधील मेघदूत मुक्तिधाम येथे अंत्यसंस्कार केले जातील.
...म्हणून वर्षभरापूर्वीच भय्यू महाराजांनी केलं होतं दुसरं लग्न
राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, सांस्कृतिक तसेच करमणूक क्षेत्रातील मंडळींचा भय्युजी महाराजांशी संबंध होता. त्यांचा सल्ला व आशीर्वाद घेण्यासाठी या क्षेत्रातील मंडळी नेहमी त्यांच्याकडे जात. मात्र, दोन महिन्यांपूर्वी त्यांनी अध्यात्म व सामाजिक कार्यातून निवृत्ती घेतली होती.
Indore: Supporters mourn as mortal remains of spiritual leader Bhaiyyuji Maharaj are being taken to his native village. He had allegedly committed suicide after shooting himself at his residence yesterday. #MadhyaPradeshpic.twitter.com/gEBFOcpgZZ
— ANI (@ANI) June 13, 2018