भंडारा-गोंदियात भाजपाला नऊ पंचायत समित्या
By admin | Published: July 12, 2015 09:40 PM2015-07-12T21:40:08+5:302015-07-12T21:40:08+5:30
Next
>सभापती निवडणूक : पाच काँग्रेसकडे, राष्ट्रवादीला एकगोंदिया/भंडारा : गोंदिया जिल्ह्यातील चार पंचायत समित्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला दूर ठेवण्यासाठी भाजपा व काँग्रेसने अनपेक्षितपणे हातमिळवणी केली. दोन्ही जिल्ह्यांतील १५ पैकी नऊ पंचायत समित्यांमध्ये भाजपाचे सभापती म्हणून निवडून आले. काँग्रेसला पाच आणि राष्ट्रवादीला एक सभापतिपद मिळाले. गोंदिया पंचायत समितीवर काँग्रेसने वर्चस्व मिळवले. सभापतीपदी स्नेहा गौतम तर उपसभापतीपदी ओमप्रकाश भक्तवर्ती निवडून आले. गोरेगावमध्ये भाजपाला सत्ता मिळाली. सभापतीपदी दिलीप चौधरी तर उपसभापतीपदी सुरेंद्र बिसेन निवडून आले. देवरीत भाजपा व काँग्रेसने हातमिळवणी करत सभापतीपदी भाजपाच्या देवकी मडावी तर उपसभापतीपदी काँग्रेसच्या संगीता भेलावे यांची निवड झाली. तिरोडा येथे राष्ट्रवादीला बहुमत असून त्यांचीच सत्ता आहे. सडक-अर्जुनीत भाजपाला बहुमत मिळाले आहे. आमगावला भाजपा व काँग्रेस युतीमुळे काँग्रेसच्या हेमलता डोये यांची सभापती तर भाजपचे ओमप्रकाश मटाले हे उपसभापती झाले आहेत. सालेकसा पंचायत समितीवर काँग्रेस व राष्ट्रवादीच्या युतीने सत्ता काबीज केली आहे. अर्जुनी-मोरगाव पंचायत समितीवर काँग्रेस व भाजपाने युती केली. सभापतिपदी भाजपाचे अरविंद शिवणकर व उपसभापतिपदी काँग्रेसच्या आशा झिलपे यांची निवड झाली. भंडारा, तुमसर, साकोली व मोहाडी पंचायत समितीत भाजपाला तर पवनी, लाखनी व लाखांदूर पंचायत समितीत काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळालेले आहे. (प्रतिनिधी)