लुटमारीसाठी व्यावसायिकाचे अपहरण करणारे गजाआड नाकाबंदीदरम्यान भांडुप पोलिसांनी केली अटक

By Admin | Published: February 14, 2015 11:51 PM2015-02-14T23:51:31+5:302015-02-14T23:51:31+5:30

लुटमारीसाठी व्यावसायिकाचे अपहरण करणारे गजाआड

Bhandup police arrested for abducting robbery for robbery | लुटमारीसाठी व्यावसायिकाचे अपहरण करणारे गजाआड नाकाबंदीदरम्यान भांडुप पोलिसांनी केली अटक

लुटमारीसाठी व्यावसायिकाचे अपहरण करणारे गजाआड नाकाबंदीदरम्यान भांडुप पोलिसांनी केली अटक

googlenewsNext
टमारीसाठी व्यावसायिकाचे अपहरण करणारे गजाआड
नाकाबंदीदरम्यान भांडुप पोलिसांनी केली अटक
मुंबई: ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाचे अपहरण करुन त्याच्याकडून २० हजाराची खंडणी मागणार्‍या दोन आरोपींना भांडुप पोलिसांनी अटक केली. दत्तात्रय मनाले(२६), सचिन सावंत(३२) अशी या आरोपींंची नावे असून त्यांंचा तिसरा साथीदार अनिल जयस्वाल फरार आहे.
ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करणारे शरीफ पठाण शुक्रवारी पहाटे चारच्या सुमारास भांडुप लालबहाददूर शास्त्री मार्गावरून रेती घेऊन जात होते. चहा घेण्यासाठी एलबीएस मार्गाच्या कडेला ते उतरले. अशात या त्रिकुटाने त्यांना वाटेत गाठले. त्यांंच्याकडे २० हजारांची मागणी केली. पैसे देण्यास नकार देताच ठार मारण्याची धमकी देत त्यांना बाईकवर मध्यभागी बसवले आणि गाडी कांजुरच्या दिशेने नेण्यास सुरुवात केली. आवाज केला तर डोक्यात पेव्हर घालण्याच्या भितीने दोन्ही आरोपींंच्या मध्ये बसलेल्या पठाण हे शांत होते. अशात भांडुप मधुबन गार्डन येथे पोलिसांंची नाकाबंदी बघून आरोपींची पाचावर धारण बसली. तर पठाण यांनी सुटकेचा निश्वास सोडला. नाकाबंदी जवळ येताच बचाव बचाव म्हणून त्यांनी मदतीसाठी टाहो फोडला. त्यामुळे आणखीनच घाबरलेल्या आरोपींचा गोंधळ उडाला. बाईकवरील नियंत्रण सुटले आणि सारेच खाली पडले. अपघातानंतर पोलिसांनी तात्काळ शफिकची आरोपींंच्या तावडीतून सुटका केली. दरम्यान अनिल हा पोलिसांंच्या हातावार तुरी देत पळुन गेला. अशात सचिन आणि दत्तात्रयला अटक करण्यास भांडुप पोलिसांना यश आले.

Web Title: Bhandup police arrested for abducting robbery for robbery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.