तुरुंगवासादरम्यान ८ वर्षांत मिळवल्या ३१ पदव्या, बाहेर पडताच मिळाली सरकारी नोकरी

By बाळकृष्ण परब | Published: November 9, 2020 10:59 AM2020-11-09T10:59:05+5:302020-11-09T11:03:25+5:30

Education News : तुरुंगात गेल्यानंतर आपल्या पुढील जीवनाला चांगली दिशा देणारे कैदी फारच थोडे असतात. असंच एक दुर्मीण उदाहरण समोर आलं आहे.

Bhanubhai Patel got 31 degrees in 8 years during his imprisonment and got a government job on his release | तुरुंगवासादरम्यान ८ वर्षांत मिळवल्या ३१ पदव्या, बाहेर पडताच मिळाली सरकारी नोकरी

तुरुंगवासादरम्यान ८ वर्षांत मिळवल्या ३१ पदव्या, बाहेर पडताच मिळाली सरकारी नोकरी

googlenewsNext
ठळक मुद्देगुजरातमधील भावनगर येथील भानूभाई पटेल यांनी तुरुंगात राहून आठ वर्षांत दोन चार नव्हे तर तब्बल ३१ पदव्या मिळवल्या

अहमदाबाद - जिद्द असेल तर माणूस परिस्थितीसमोर हार न मानता काहीही साध्य करू शकतो, असं म्हटलं जातं. ही बाब एका कैद्याने तंतोतंत खरी करून दाखवली आहे. साधारणपणे तुरुंगात गेल्यानंतर कैद्याचं आय़ुष्य हे नैराश्यमय होतं किंवा असे कैदी आधीच्यापेक्षा अधिक सराईत गुन्हेगार बनतात. मात्र तुरुंगात गेल्यानंतर आपल्या पुढील जीवनाला चांगली दिशा देणारे कैदी फारच थोडे असतात. असंच एक दुर्मीण उदाहरण गुजरातमधून समोर आलं आहे.

गुजरातमधील भावनगर येथील भानूभाई पटेल यांनी तुरुंगात राहून आठ वर्षांत दोन चार नव्हे तर तब्बल ३१ पदव्या मिळवल्या. त्यांच्या या कर्तृत्वामुळे तुरुंगातून बाहेर पडताच सरकारी नोकरी मिळवली. भानूभाई एवढ्यावरच थांबले नाहीत तर नोकरी मिळाल्यानंतर पुढच्या पाच वर्षांत त्यांनी अजून २३ पदव्या मिळवल्या. त्यामुळे भानूभाईंचे नाव लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स, एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स, युनिक वर्ल्ड रेकॉर्ड्स, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स, युनिव्हर्सल रेकॉर्ड फोरम आणि वर्ल्ड रेकॉर्ड इंडियामध्ये नोंद झाले.

५९ वर्षांच्या वर्षांचे भानूभाई पटेल हे मूळचे भावनगरमधील महुवा तालुक्यातील रहिवासी आहेत. अहमादाबादमधील बीजे. मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएसची पदवी घेतल्यानंतर १९९२ मध्ये मेडिकलच्या पदवीसाठी ते अमेरिकेत गेले होते. तिथे त्यांचा एक मित्र विद्यार्थी व्हिजावर काम करून आपला पगार भानूभाईंच्या खात्यात ट्रान्सफर करत असे. त्यामुळे त्यांच्यावर फॉरेन एक्सचेंज रेग्युलेशन अ‍ॅक्टच्या उल्लंघनाचा आरोप झाला होता. तसेच वयाच्या ५० व्या वर्षी १० वर्षांची शिक्षा झाली. त्यामुळे त्यांना अहमदाबादमधील कारागृहात १० वर्षे शिक्षा भोगावी लागली. याकाळात त्यांनी आठ वर्षांत एकूण ३१ पदव्या मिळवल्या.



सर्वसाधारणपणे तुरुंगात गेलेल्या व्यक्तीला सरकारी नोकरी मिळत नाही. मात्र तुरुंगातून मुक्त झाल्यानंतर भानूभाई यांना आंबेडकर विद्यापीठाने नोकरीची ऑफर दिली. या नोकरीदरम्यान त्यांनी ५ वर्षांत अजून २३ पदव्या मिळवल्या. अशाप्रकारे आतापर्यंत त्यांच्या नावावर एकूण ५४ पदव्यांची नोंद झाली आहे.

दरम्यान, भानूभाई यांनी लॉकडाऊनच्या कालावधील आपले तुरुंगातील अनुभव आणि विश्वविक्रमापर्यंतच्या प्रवासावर आधारित तीन पुस्तके गुजराती, हिंदी आणि इंग्रजी भाषेत लिहिली. भानूभाई यांनी गुजरात विधानसभा निवडणुकीत प्रिसायडिंग ऑफिसर म्हणूनही काम केले आहे.

नॅशनल क्राइम ब्युरोच्या एका रिपोर्टनुसार गुजरातमधील तुरुंगांमध्ये अशिक्षित कैद्यांपैक्षा शिक्षित कैद्यांचे प्रमाण अधिक आहे. यामध्ये पदवी, इंजिनियरिंग, पदव्यूत्तर पदवी मिळवेल्या कैद्यांचा समावेश आहे. गुजरातमधील तुरुंगात ४४२ पदवीधर, १५० टेक्निकल डिग्री-डिप्लोमाधारक, २१३ पदव्युत्तर पदवीधारक कैदी आहेत. बहुतांश कैदी हे अपहरण आणि हत्येसारख्या गुन्ह्यांची शिक्षा भोगत आहेत.

Read in English

Web Title: Bhanubhai Patel got 31 degrees in 8 years during his imprisonment and got a government job on his release

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.