Bharat 6G Vision Documents: 4G-5G विसरा अन् 6G च्या तयारी लागा; PM मोदींनी लॉन्च केले 6G व्हिजन डॉक्यूमेंट, जाणून घ्या माहिती...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2023 03:00 PM2023-03-22T15:00:52+5:302023-03-22T15:01:37+5:30
Bharat 6G Vision Documents : काही महिन्यांपूर्वीच भारतात 5G टेक्नोलॉजी लॉन्च झाली, आता भारत 6G कडे वाटचाल करत आहे.
नवी दिल्ली: काही महिन्यांपूर्वीच देशात 5G सेवा सुरू झाली आहे. पण, अद्याप संपूर्ण देशामध्ये ही सेवा सुरू नसून, काही प्रमुख शहरांमध्येच 5g नेटवर्क मिळत आहे. तुमच्यापैकी अनेकजण 5G नेटवर्कची वाट पाहत असतील, पण आता देश 6G कडे वाटचाल करत आहे. देशात 5G लॉन्च होण्यास विलंब झाला असला तरी 6G ची लॉन्च होण्यास विलंब होणार नाही.
देशात 6G ची तयारी सुरू झाली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी इंडिया 6G व्हिजन डॉक्युमेंट सादर केले. यासोबतच त्यांनी 6G संशोधन आणि विकास चाचणी बेडही लॉन्च केला आहे. हे दस्तऐवज देशात 6G तंत्रज्ञान लॉन्च करण्यासाठी आणि स्वीकारण्यासाठी उपयुक्त ठरतील. 5G लाँचच्या वेळीही PM मोदींनी 6G साठी तयारी सुरू करण्याबद्दल बोलले होते. 6G च्या व्हिजन डॉक्युमेंटशी संबंधित काही खास गोष्टी जाणून घेऊया.
पीएम मोदी काय म्हणाले?
Speaking at inauguration of ITU Area Office & Innovation Centre in Delhi. Initiatives like 6G Test Bed & 'Call Before You Dig' app are also being launched. https://t.co/z6hRdeTPbB
— Narendra Modi (@narendramodi) March 22, 2023
6G व्हिजन डॉक्युमेंट सादर करताना पीएम मोदी म्हणाले, 'हे Decade भारताचे Tech-ade आहे. भारताचे दूरसंचार आणि डिजिटल मॉडेल स्मूथ, सुरक्षित, पारदर्शक, विश्वासार्ह आणि चाचणी केलेले आहे. ITU (इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियन) एरिया ऑफिस आणि इनोव्हेशन सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान मोदींनी या गोष्टी सांगितल्या.
6G व्हिजन डॉक्युमेंट कोणी तयार केले आहे?
भारत 6G व्हिजन डॉक्युमेंट टेक्नॉलॉजी इनोव्हेशन ग्रुपने तयार केले आहे. हा ग्रुप नोव्हेंबर 2021 मध्ये सुरू झाला. या गटात विविध मंत्रालये आणि विभाग, संशोधन आणि विकास संस्था, शैक्षणिक, दूरसंचार सेवा प्रदाते आणि उद्योगातील लोकांचा समावेश आहे. या गटाचे काम भारतात 6G लाँचसाठी रोडमॅप तयार करणे आहे.
चाचणी बेडचा फायदा काय आहे?
6G व्हिजन डॉक्युमेंटसोबत PM मोदींनी 6G टेस्ट बेड देखील लॉन्च केला आहे. याच्या मदतीने उद्योग, शैक्षणिक संस्था आणि इतर प्लॅटफॉर्म विकसनशील तंत्रज्ञानाची चाचणी घेण्यास सक्षम असतील. भारत 6G व्हिजन डॉक्युमेंट आणि 6G टेस्ट बेडमुळे देशाला नवकल्पना सक्षम करण्यास, क्षमता निर्माण करण्यास आणि नवीन तंत्रज्ञानाचा जलद अवलंब करण्यास मदत होईल.