Bharat Bandh: 'अग्निपथ'विरोधात आज भारत बंद; दिल्ली बॉर्डरवर मोठा जाम, देशभरातील शेकडो ट्रेन रद्द

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2022 12:27 PM2022-06-20T12:27:51+5:302022-06-20T12:33:23+5:30

Bharat Bandh News: केंद्र सरकारच्या नवीन 'अग्निपथ' योजनेविरोधात बिहार, उत्तर प्रदेश, हरियाणा, मध्य प्रदेशसह देशातील अनेक राज्यांमध्ये हिंसक निदर्शने होत आहेत.

Bharat Bandh | Agneepath Scheme| India closed today against 'Agneepath' scheme, tight security in many states including, many trains cancelled | Bharat Bandh: 'अग्निपथ'विरोधात आज भारत बंद; दिल्ली बॉर्डरवर मोठा जाम, देशभरातील शेकडो ट्रेन रद्द

Bharat Bandh: 'अग्निपथ'विरोधात आज भारत बंद; दिल्ली बॉर्डरवर मोठा जाम, देशभरातील शेकडो ट्रेन रद्द

Next

Bharat Bandh Protest: काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने सैन्यात भरतीसाठी 'अग्निपथ' योजना आणली आहे. या योजनेविरोधात देशभरातील तरुण रस्त्यावर उतरुन निषेध करत असून, अनेक राज्यात तोडफोड आणि जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत. बिहार, उत्तर प्रदेश, हरियाणा, मध्य प्रदेशसह देशातील अनेक राज्यांमध्ये योजनेच्या विरोधात हिंसक निदर्शने होत आहेत. दरम्यान, या योजनेविरोधात देशभरातील अनेक संघटनांनी आज(20 जून) भारत बंदची घोषणा केली आहे. भारत बंदच्या घोषणेनंतर राज्यांतील पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्यास सुरुवात केली आहे. रेल्वेला नुकसान होण्यापासून वाचवण्यासाठी जीआरपी आणि आरपीएफनेही तयारी केली आहे.


हरियाणामध्ये या आंदोलनाबाबत यापूर्वी अनेक जिल्ह्यांमध्ये हिंसक निदर्शने झाली होती. अशा स्थितीत भारत बंद दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून फरिदाबाद पोलिसांनी आपली सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. उत्तर प्रदेशातील नोएडा पोलिसांचे म्हणणे आहे की, गौतम बुद्ध नगरमध्ये कलम 144 आधीपासूनच लागू आहे, त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा कोणताही प्रयत्न केल्यास कडक कारवाई केली जाईल. ग्रेटर नोएडातील यमुना एक्सप्रेस वेवर शुक्रवारी झालेल्या आंदोलनाप्रकरणी 200 हून अधिक लोकांना अटक करण्यात आली आहे.

केरळ पोलिसांनीही भारत बंदची तयारी मजबूत केली आहे. केरळ पोलिसांनी सांगितले आहे की त्यांचे सर्व जवान 20 जून रोजी कर्तव्यावर असतील. यादरम्यान जर कोणी कोणत्याही प्रकारचा हिंसाचार पसरवण्याचा प्रयत्न केला तर त्याला अटक करू. झारखंडमध्येही भारत बंदच्या पार्श्वभूमीवर सर्व शाळा आणि काही संस्था बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर पंजाब पोलिसांनीही भारतासंदर्भात विशेष तयारी केली आहे. 

दिल्ली बॉर्डरवर मोठा ट्रॅफिक जाम
देशभरात बंदचा परिणाम दिसून येत आहे. भारत बंदमुळे दिल्ली-गुरुग्राम सीमेवर मोठा जाम झाला आहे. रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. बिहारमध्येही तरुणाई बंद यशस्वी करण्याचा प्रयत्न करत आहे. फोनवरुन चुकीची माहिती प्रसारित होऊ नये, यासाठी पोलिसांनी कडक शब्दात इशारा दिला आहे. गैरप्रकार करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यासाठी आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.

अनेक रेल्वे रद्द
अग्निपथ योजनेच्या विरोधातील आंदोलनाचा सर्वाधिक फटका रेल्वेला बसला आहे. अनेक गाड्यांची जाळपोळ झाल्यानंतर आता आज 181 मेल एक्सप्रेस रद्द तर 348 पॅसेंजर गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. 4 मेल एक्सप्रेस आणि 6 पॅसेंजर गाड्या अंशतः रद्द करण्यात आल्या आहेत. रेल्वे मंत्रालयाने याबाबत माहिती दिली.

Web Title: Bharat Bandh | Agneepath Scheme| India closed today against 'Agneepath' scheme, tight security in many states including, many trains cancelled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.