भारत माता की जय ! दहशतवाद्यांचा खात्मा केल्यानंतर जवानांचं सेलिब्रेशन
By admin | Published: June 5, 2017 12:50 PM2017-06-05T12:50:16+5:302017-06-05T12:50:16+5:30
सीआरपीएफ कॅम्पवर हल्ला करणा-या दहशतवाद्यांचा खात्मा केल्यानंतर सुरक्षा जवानांनी वेगळ्या अंदाजात आपला आनंद व्यक्त केला
Next
ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. 5 - सीआरपीएफ कॅम्पवर हल्ला करणा-या दहशतवाद्यांचा खात्मा केल्यानंतर सुरक्षा जवानांनी वेगळ्या अंदाजात आपला आनंद व्यक्त केला. जम्मू काश्मीरमधील बंदीपुरा जिल्ह्यातील संबल परिसरात रात्री दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. जवानांनी दहशतवाद्यांचा खात्मा केल्यानंतर जोरजोरात "भारत माता की जय"च्या घोषणा दिल्या. हल्ला परतवून लावताना जवानांनी चार दहशतवाद्यांना ठार केलं.
सीआरपीएफ अधिकारी योगेश कुमार यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, "दहशतवाद्यांनी रात्री उशिरा 3.30 वाजण्याचा आसपास छावणीवर आत्मघाती हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा हा प्रयत्न जवानांनी हाणून पाडला. सोबतच चार दहशतवाद्यांना ठार केलं".
WATCH: CRPF jawans raise 'Bharat Mata ki Jai' slogans after thwarting suicide attack attempt by fidayeen terrorists on camp in Bandipora,J&K pic.twitter.com/r0ileu4MRR
— ANI (@ANI_news) June 5, 2017
दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या 45व्या बटालियनच्या कॅम्पला लक्ष्य केलं होतं. मात्र जवानांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात 4 दहशतवादी ठार झाले. त्यानंतर लष्करानं आजूबाजूच्या परिसरात शोधमोहीम सुरू केली. तत्पूर्वी 3 जून रोजी लष्कराच्या ताफ्यावर अशाच प्रकारचा दहशतवाद्यांनी हल्ला करण्यात आला होता. त्यावेळी हल्ल्यात दोन जवान शहीद झाले होते. तसेच जवळपास चार जवान जखमी झाल्याची माहिती मिळाली होती. अनंतनाग येथील काझीगुंड येथे दहशतवाद्यांनी हा हल्ला केला होता.
Terrorists tried storming camp around 3:30 am to execute a fidayeen attack.Thwarted,4 terrorists gunned down:Yogesh Kumar,Sub Inspector CRPF pic.twitter.com/asat2HeUKR
— ANI (@ANI_news) June 5, 2017
जखमी जवानांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. लष्कराचा ताफा राष्ट्रीय महामार्गावरून लोअर मुंडा येथून जात असताना दक्षिण काश्मीरजवळील काझीगुंड येथे दहशतवाद्यांनी हल्ला चढवला", अशी माहिती लष्कराच्या वरिष्ठ अधिका-याने दिली होती. चार जवान जखमी झाले होते. गंभीररीत्या जखमी झालेले दोन जवान शहीद झाले होते. त्यावेळीही संपूर्ण परिसरात नाकाबंदी करण्यात आली होती. हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी सर्च ऑपरेशन सुरू होते.