भारतरत्न हा तर सवर्ण आणि ब्राह्मणांचा क्लब- ओवेसी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2019 07:26 AM2019-02-08T07:26:16+5:302019-02-08T07:29:01+5:30

देशाच्या सर्वोच्च नागरी सन्मानावरुन ओवेसींची मोदी सरकारवर टीका

Bharat Ratna is a club of Brahmins and upper caste says aimim chief Asaduddin Owaisi | भारतरत्न हा तर सवर्ण आणि ब्राह्मणांचा क्लब- ओवेसी

भारतरत्न हा तर सवर्ण आणि ब्राह्मणांचा क्लब- ओवेसी

Next

नवी दिल्ली: एमआयएमचे अध्यक्ष आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसींनी भारतरत्नवरुन मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. भारतरत्न म्हणजे सवर्ण आणि ब्राह्मणांचा क्लब असल्याचं वादग्रस्त विधान ओवेसी यांनी म्हटलं आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात बोलताना त्यांनी हे विधान केलं. काही दिवसांपूर्वीच मोदी सरकारनं तीन व्यक्तींना भारतरत्न देण्याची घोषणा केली. यामध्ये माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी, भूपेन हजारिका आणि नानाजी देशमुख यांच्या नावांचा समावेश आहे. 

संसदेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्ताव आणण्यात आला. त्यावर चर्चा सुरू असताना मोदी सरकारनं जाहीर केलेल्या भारतरत्न पुरस्कारांवर ओवेसींनी टीका केली. भारतरत्न हा तर ब्राह्मण आणि सवर्णांचा क्लब आहे. देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान देताना पारदर्शकता पाळली जात नाही, असा आरोप त्यांनी केला. यावेळी त्यांनी चंद्रचूड समितीच्या अहवालाचा उल्लेख केला. दीन दयाळ उपाध्याय यांना भारतरत्न जाहीर झाला. त्यांच्यावर अनेक गंभीर आरोप आहेत. इतिहासवर एक दृष्टीक्षेप टाकल्यास भारतरत्न म्हणजे केवळ सवर्णांचा क्लब असल्याचं तुमच्या लक्षात येईल, असं ओवेसी म्हणाले. 

गेल्या महिन्यातही ओवेसींनी भारतरत्नवरुन मोदी सरकारवर जोरदार टीका केली होती. किती दलित, आदिवासी, मुस्लिम यांना आतापर्यंत भारतरत्न देण्यात आला?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना देण्यात आलेल्या भारतरत्न पुरस्कारावरही ओवेसींनी भाष्य केलं. आंबेडकर यांना नाखुशीनं भारतरत्न देण्यात आला. सरकारला गरज वाटली म्हणून त्यांचा सन्मान करण्यात आला, असा दावा त्यांनी केला. 

सरकारच्या चुकांमध्ये आज काश्मीरमधील समस्या आणखी गंभीर झाली आहे. मोदी काश्मीरमध्ये जातात. दल लेकची सफर करतात आणि बाजूला कोणीही नसताना हात दाखवत फिरतात. मोदींच्या चुकीच्या धोरणांमुळेच आज दक्षिण आशियात भारत एकाकी पडला आहे. या देशाला चौकीदाराची गदज नाही. पंतप्रधान आणि त्यांचं मंत्रिमंडळ घटनेच्या विरुद्ध काम करत आहे, अशी टीका ओवेसींनी केली. 

Web Title: Bharat Ratna is a club of Brahmins and upper caste says aimim chief Asaduddin Owaisi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.