"2024 च्या निवडणुकीत जगातील सर्वात मोठ्या पक्षाची विजयाच्या दिशेनं वाटचाल!" US मिडिया भाजपवर फिदा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2023 04:00 PM2023-03-21T16:00:10+5:302023-03-21T16:01:13+5:30

जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखानुसार, अमेरिकेच्या दृष्टिनेही भाजप हा सर्वात महत्त्वाचा पक्ष आहे...

Bharatiya janata party Heading for Victory in 2024 Elections said us media wall street journal | "2024 च्या निवडणुकीत जगातील सर्वात मोठ्या पक्षाची विजयाच्या दिशेनं वाटचाल!" US मिडिया भाजपवर फिदा

"2024 च्या निवडणुकीत जगातील सर्वात मोठ्या पक्षाची विजयाच्या दिशेनं वाटचाल!" US मिडिया भाजपवर फिदा

googlenewsNext

देशातील सत्ताधारी पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाचे (BJP) अमेरिकन मिडियाने जबरदस्त कौतुक केले आहे. अमेरिकन वृत्तपत्र वॉल स्ट्रीट जर्नलने भाजप जगातील सर्वात महत्त्वाचा राजकीय पक्ष असल्याचे म्हटले आहे. एवढेच नाही, तर 2014, 2019 मध्ये बम्पर विजयानंतर 2024 मध्ये भाजप पुन्हा एकदा मोठ्या विजयाकडे वाटचाल करत आहे. आगामी काळात भाजप भारतात वेगाने आपले वर्चस्व प्रस्थापित करेल, असेही या जर्नलमध्ये म्हणण्यात आले आहे.

जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखानुसार, अमेरिकेच्या दृष्टिनेही भाजप हा सर्वात महत्त्वाचा पक्ष आहे. वॉल स्ट्रीट जर्नलने (WSJ) आपल्या लेखात म्हटले आहे की, 2014 आणि 2019 मध्ये सलग दोन विजय मिळवल्यानंतर, भारतीय जनता पक्ष 2024 मध्ये होणाऱ्या निवडणुकीत सलग तिसऱ्यांदा विजयाकडे कूच करत आहे. याच बरोबर भारत एक मोठी आर्थिक शक्ती म्हणून उदयास येत असल्याचेही यात लेखात म्हणण्यात आले आहे.

अमेरिका भारताशिवाय चीनचा सामना करू शकत नाही -
याशिवाय, अमेरिका भारताच्या मदतीशिवाय चीनचा सामना करू शकत नाही, असेही वॉल स्ट्रीट जर्नलने आपल्या या लेखात म्हटले आहे. हा लेख प्रकाशित झाल्यानंतर भाजप नेते अरुण सिंह यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. पीएम मोदींच्या नेतृत्वात भाजप सातत्याने वाढत आहे आणि संपूर्ण जग पीएम मोदी आणि भाजपच्या धोरणांचे कौतुक करत आहे, असे अरुण सिंह यांनी म्हटले आहे.

43 वर्षांतील भाजपचा विस्तार - 
- 1981 मध्ये संपूर्ण देशात भाजपचे केवळ 148 आमदार होते, आज त्यांची संख्या 1296 एवढी झाली आहे.
- 1984 मध्ये भाजपचे केवळ दोन खासदार होते, आज हा आकडा 303 वर गेला आहे.
- 1984 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला 1.89 कोटी मते मिळाली होती, तर 2019 च्या लोकसभा निवडणुकीत 22.89 कोटी मते मिळाली आहेत.
- आज भाजप जगातील सर्वात मोठा पक्ष आहे. भाजपकडे 17 कोटींहून अधिक कार्यकर्ते आहेत. तर चीनच्या कम्युनिस्ट पक्षाकडे 9.14 कोटी कार्यकर्ते आहेत.

Web Title: Bharatiya janata party Heading for Victory in 2024 Elections said us media wall street journal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.