Uttar Pradesh MLC Election 2022: भाजपकडून 30 उमेदवारांची यादी जाहीर; जाणून घ्या कोण, कोठून आहे उमेदवार?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2022 03:49 PM2022-03-19T15:49:42+5:302022-03-19T15:51:15+5:30
Uttar Pradesh MLC Election 2022: भारतीय जनता पक्षाने (भाजप) उत्तर प्रदेश विधान परिषद निवडणुकीसाठी 30 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.
लखनऊ : भारतीय जनता पक्षाने (भाजप) उत्तर प्रदेश विधान परिषद निवडणुकीसाठी 30 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. भाजपने मुरादाबाद-बिजनौर स्थानिक प्राधिकरणातून सत्यपाल सैनी, रामपूर-बरेली स्थानिक प्राधिकरणातून कुंवर महाराज सिंह, बदायूं स्थानिक प्राधिकरणातून वागीश पाठक, पीलीभीत-शाहजहानपूर स्थानिक प्राधिकरणातून डॉ. सुदीप गुप्ता यांना उमेदवारी दिली आहे.
हरदोई स्थानिक प्राधिकरणातून डॉ. अशोक अग्रवाल, खीरी स्थानिक प्राधिकरणातून अनूप गुप्ता, सीतापूर स्थानिक प्राधिकरणातून पवन सिंह चौहा हे भाजपचे उमेदवार आहेत. याशिवाय, लखनऊ-उन्नाव स्थानिक प्राधिकरणाकडून रामचंद्र प्रधान, रायबरेली स्थानिक प्राधिकरणातून दिनेश प्रताप सिंह, प्रतापगढ स्थानिक प्राधिकरणाकडून हरिप्रताप सिंह हे भाजपचे उमेदवार आहेत.
याचबरोबर, भाजपने बाराबंकी स्थानिक प्राधिकरणातून अंगद कुमार सिंह, बहराइच स्थानिक प्राधिकरणातून डॉ. प्रज्ञा त्रिपाठी, गोंडा स्थानिक प्राधिकरणातून अवधेश सिंग मंजू, फैजाबाद स्थानिक प्राधिकरणातून हरी ओम पांडे, गोरखपूर-महाराजगंज स्थानिक प्राधिकरणातून सीपी चंद यांना उमेदवारी दिली आहे.
BJP releases list of its candidates for biennial elections to legislative councils of Uttar Pradesh. pic.twitter.com/whERLHqLZG
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) March 19, 2022
देवरिया स्थानिक प्राधिकरणाकडून रतनपाल सिंग, आझमगढ-मऊ स्थानिक प्राधिकरणाकडून अरुण कुमार यादव, बलिया ये रविशंकर सिंग पप्पू, गाझीपूर स्थानिक प्राधिकरणाचे चंचल सिंग, अलाहाबाद स्थानिक प्राधिकरणाचे केपी श्रीवास्तव, बांदा-हमीरपूर स्थानिक प्राधिकरणाचे जितेंद्र सिंहसेंगर, झाशी-जालौन-ललितपूर स्थानिक प्राधिकरणाने रामा निरंजन यांना उमेदवारी दिली आहे.
इटावा-फर्रुखाबाद स्थानिक प्राधिकरण, आग्रा-फिरोजाबाद स्थानिक प्राधिकरणाकडून प्रांशु दत्त द्विवेदी, आग्रा-फिरोजाबाद स्थानिक प्राधिकरणाकडून विजय शिवहरे, मथुरा-एटा-मैनपुरी स्थानिक प्राधिकरणाकडून ओमप्रकाश सिंह, मथुरा-एटा-मैनपुरी स्थानिक प्राधिकरणातून आशिष यादव आशू, अलीगढमधून ऋषिपाल सिंग, बुलंदशहरमधून नरेंद्र भाटी, मेरठ-गाझियाबाद स्थानिक प्राधिकरणातून धर्मेंद्र भारद्वाज, मुझफ्फरनगर-सहारनपूरमधून वंदना मुदित वर्मा उमेदवार आहेत.
9 एप्रिल रोजी मतदान
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमताने विजयी झाल्यानंतर भाजप आता विधान परिषदेच्या निवडणुकीकडे लक्ष केंद्रित करत आहे. येत्या 9 एप्रिल रोजी 36 जागांसाठी द्विवार्षिक निवडणुकीत बहुमत मिळवण्यासाठी भाजप युद्धपातळीवर प्रयत्न करणार आहे. दरम्यान, या निवडणुका दोन टप्प्यात होणार आहेत. पहिल्या टप्प्यात 30 आणि दुसऱ्या टप्प्यात सहा जागांची निवडणूक होईल. यासाठी 15 ते 22 तारखेपर्यंत अर्ज दाखल केले जातील. 9 एप्रिल रोजी मतदान होईल, तर, 12 एप्रिल रोजी निकाल जाहीर होईल. सध्या विधानपरिषदेत सपाचे 48 जागांसह बहुमत आहे. तर, भाजपच्या 36 जागा आहेत.