भरसभेत मंत्र्यामुळे मोदींच्या फोटोवर मारल्या चपला, म्हणाले डाकू

By admin | Published: March 1, 2017 09:11 PM2017-03-01T21:11:30+5:302017-03-01T21:26:44+5:30

बिहार सरकारमधील मंत्री अब्दुल जलील मस्तान यांच्या एका सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोवर चपला

Bharatiya Sabha minister shot dead on Modi's photo, said the robbers | भरसभेत मंत्र्यामुळे मोदींच्या फोटोवर मारल्या चपला, म्हणाले डाकू

भरसभेत मंत्र्यामुळे मोदींच्या फोटोवर मारल्या चपला, म्हणाले डाकू

Next
>ऑनलाइन लोकमत
पाटणा, दि. 1 -बिहार सरकारमधील मंत्री अब्दुल जलील मस्तान यांच्या एका सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोवर चपला मारण्याच्या घटनेवरील वाद वाढत आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी हे कृत्य चुकीचं असल्याचं म्हटलं आहे. तर वाद वाढत असल्याचं पाहून मस्तान यांनी माफी मागितली आहे. 
 
22 फेब्रुवारी रोजी पूर्णिया जिल्ह्यात  मंत्री अब्दुल जलील मस्तान कॉंग्रेस पक्षाद्वारे आयोजित सभेला संबोधित करत होते. नोटबंदीच्या निर्णयावर टीका करताना रागाच्या भरात त्यांनी मोदींना डाकू म्हटलं. अशा पंतप्रधानांना चपला मारल्या पाहिजे असं ते उपस्थित जनसमुदायाला म्हणाले. त्यावर एक कार्यकर्ता मोदींचा फोटो घेऊन स्टेजवर आला आणि फोटोला चपला मारण्यास सुरूवात केली. या घटनेचा एक विवादीत व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आणि मोठा वाद निर्माण झाला.  
 
बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी देखील मंत्र्याने वापरलेले शब्द चुकीचे होते असं म्हटलं आहे तर दुसरीकडे कॉंग्रेसनेही मंत्र्याने वापरलेल्या शब्दांवर दु:ख व्यक्त केलं आहे. 
 

Web Title: Bharatiya Sabha minister shot dead on Modi's photo, said the robbers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.