घटनेच्या पानांचे डिझाईन करणारे भार्गव यांचे निधन
By admin | Published: December 26, 2016 12:45 AM2016-12-26T00:45:08+5:302016-12-26T00:49:50+5:30
भारतीय राज्यघटनेच्या पानांचे नक्षीकाम करणारे व राष्ट्रीय बोधचिन्ह अशोक स्तंभाचे डिझाईन करणाऱ्या कलाकारांच्या संचातील सहकलाकार
भोपाळ : भारतीय राज्यघटनेच्या पानांचे नक्षीकाम करणारे व राष्ट्रीय बोधचिन्ह अशोक स्तंभाचे डिझाईन करणाऱ्या कलाकारांच्या संचातील सहकलाकार दीनानाथ भार्गव (८९) यांचे इंदूर येथे शनिवारी निधन झाले. ते गेल्या दहा वर्षांपासून हृदयविकाराने आजारी होते, असे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले.
दीनानाथ भार्गव यांच्या मागे दोन मुले व दोन मुली आहेत. भारतीय राज्य घटनेच्या पानांचे नक्षीकाम करण्यासाठी प्रसिद्ध चित्रकार व शांती निकेतनमधील कला भवनचे तत्कालीन प्राचार्य नंदलाल बोस यांनी अवघ्या २० वर्षांच्या भार्गव यांची कलाकारांच्या संचात निवड केली. भार्गव हे तेव्हा शांतीनिकेतनमध्ये तीन वर्षांचा फाईन आर्टमध्ये डिप्लोमा करीत होते. (वृत्तसंस्था)