भवानी माता मंदिराला यात्रेचे स्वरूप विक्रेत्यांची थाटली दुकाने : देवीची ओटी भरण्यासाठी महिलांची गर्दी
By admin | Published: October 14, 2015 09:02 PM2015-10-14T21:02:52+5:302015-10-14T22:58:49+5:30
जळगाव- नवरात्रोत्सवात सुभाष चौकातील भवानी माता (महालक्ष्मी) मंदिरात दर्शनासाठी दुसर्या माळेपासून गर्दी होण्यास सुरुवात झाली असून मंदिराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे़
जळगाव- नवरात्रोत्सवात सुभाष चौकातील भवानी माता (महालक्ष्मी) मंदिरात दर्शनासाठी दुसर्या माळेपासून गर्दी होण्यास सुरुवात झाली असून मंदिराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे़
भवानी मातेच्या या मंदिराचा १९२४ मध्ये मंदिराचा जिर्णोद्धार झाला. जयपूर येथून आणलेली देवीची आकर्षक मूर्ती मंदिराचे खास आकर्षण आहे़ उत्सवात मूर्तीला आकर्षक साज-शृंगार चढविला जातो़ जागृत देवस्थान म्हणून या मंदिराची ओळख आहे़ त्यामुळे देवीची ओटी भरण्यासाठी येथे नऊ दिवस महिलांची प्रचंड गर्दी असते़
विक्रेत्यांनी थाटली दुकाने
मंदिराच्या परिसरात खण-नारळ, चुनरी आदी पूजा साहित्य विक्रे त्यांनी दुकाने थाटली आहेत़ सोबतच घरगुती वापराच्या वस्तू तसेच महिलांच्या साज-शृंगाराचे साहित्यदेखील विक्रीसाठी ठेवले आहे़ विशेष म्हणजे यंदा विक्रेत्यांनी साहित्य विक्रीसाठी ३० रुपये हर एक माल असे सेल लावले आहेत़ त्यामुळे खरेदीसाठी ग्राहकांची येथे प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे़
असे आहेत कार्यक्रम
नवरात्रात पहाटे पाच वाजता काकडा आरती़ सकाळी सात वाजता नित्य आरती़ दहा वाजता श्रीसुक्त म्हणून दुग्धाभिषेक़ दुपारी १२ ला शृंगार व नैवेद्य आरती़ सायंकाळी पावणेसातला संध्या आरती तर रात्री ११ ला शयन आरती. २१ रोजी दुपारी ४ ते सायंकाळी ८ वाजेदरम्यान नवचंडी पाठ़