भवरलाल जैन यांच्या अस्थींचे विसर्जन

By admin | Published: March 11, 2016 10:24 PM2016-03-11T22:24:53+5:302016-03-11T22:24:53+5:30

सोबत फोटो-१२ सीटीआर ०४

Bhavarlal Jain's bones immersed | भवरलाल जैन यांच्या अस्थींचे विसर्जन

भवरलाल जैन यांच्या अस्थींचे विसर्जन

Next
बत फोटो-१२ सीटीआर ०४

जळगाव : आपले संपूर्ण आयुष्य शेती,शेतकरी आणि शाश्वत विकासाला अर्पण करणार्‍या स्व. भवरलाल जैन यांच्या अस्थी भारतातील प्रमुख नद्या, तीर्थस्थाने व समुद्रात विसर्जीत करण्यात आल्या.
कनिष्ठ पूत्र अतुल जैन व परिवारातील सदस्यांनी सर्व प्रथम प्रयाग येथील गंगा, यमुना, सरस्वती संगमावर विधी करून अस्थी विसर्जन केले. यानंतर नाशिक येथील रामकुंड, त्र्यंबकेश्वर येथील चक्रतीर्थ, मध्यप्रदेशातील नर्मदेवरील ओंकारेश्वर, गुजराथमधील कपील, हिरण, सरस्वती नदीवरील श्रीक्षेत्र सोमनाथ, पालिताना, राजास्थानचे पुष्कर सरोवर, छत्तीसगडमधील महानदी सोमपूर, पैरी नदीवरील राजीम, हिमाचल प्रदेशातील व्यास पर्वती नदीवरील तीर्थ क्षेत्र, आसामातील ब्रšापूत्रा नदी, आध्रमधील दक्षिण काशी,-पिठापुरम, महाराष्ट्रातील तापी-गौमती, पुलिंदा नदीवरील प्रकाशा, गिरणा, तापी, अंजनी नदीवरील रामेश्वर, हरिद्वार येथील गंगा, कर्नाटकातील कावेरी-काबिनी,हेमवती नदीचा श्रीरंगप˜नम येथील संगम, केरळ येथील निलानदी, कन्याकुमारी येथील तीन महासागरांचा संगम, बंगालचा उपसागर, अरबी समुद्र आणि हिंद महासागर या तीर्थक्षेत्रांवर अस्थी विसर्जन करण्यात आले. देशविदेशात आपल्या कार्याचा ठसा उमटवून स्व. भवरलाल जैन यांनी लाखो शेतकर्‍यांच्या जीवनात समृद्धीची पहाट फुलविली होती. त्याच कृतज्ञ भावनेतून त्यांच्या अस्थिंचे विसर्जन विविध तीर्थक्षेत्र, सप्तनद्या आणि समुद्रात करण्याचा निर्णय जैन कुटुंबियांनी घेतला होता.

Web Title: Bhavarlal Jain's bones immersed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.