कौतुकास्पद! भावना कांत इतिहास रचणार; प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये सहभागी होणाऱ्या पहिल्या महिला फायटर पायलट ठरणार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2021 04:35 PM2021-01-19T16:35:14+5:302021-01-19T16:49:40+5:30

भावना भारतीय वायूसेनेकडून आयोजित केल्या जाणाऱ्या परेडचा एक भाग असणार आहे. ज्याची थिम 'मेक इन इंडिया' आहे.

Bhavna kant will be the first female firefighter pilot to attend the republic day parade | कौतुकास्पद! भावना कांत इतिहास रचणार; प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये सहभागी होणाऱ्या पहिल्या महिला फायटर पायलट ठरणार

कौतुकास्पद! भावना कांत इतिहास रचणार; प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये सहभागी होणाऱ्या पहिल्या महिला फायटर पायलट ठरणार

googlenewsNext

भावना कांत प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी परेडमध्ये सहभागी होणारी पहिली पहिला पायलट ठरणार आहे. भारतीय  वायुसनेच्या फायटर पायलट दलात सहभागी होणारी ही तिसरी महिला आहे. गेल्यावर्षी भावनाला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी नारी शक्ती पुरस्काराने सन्मानीत केले होते.  भावना भारतीय वायूसेनेकडून आयोजित केल्या जाणाऱ्या परेडचा एक भाग असणार आहे. ज्याची थिम 'मेक इन इंडिया' आहे.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ती राफेल आणि सुखोई याशिवाय इतर लडाऊ विमान उडवणं पसंत करेल. भारतीय वायूसेना या दरम्यान एलसीए तेजस, लाइट कॉमबॅट हेलिकॉप्टर, रोहिणी रडार, आकाश मिसाइल आणि सुखोई ३० एमकेआयचे प्रदर्शन करणार आहे. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी ही संधी मिळणार असल्याचा आनंद भावनाला आहे. 

माझ्यासाठी गर्वाची बाब

भावनाने माध्यमांशी बोलताना सांगितले की, ''दरवर्षी मी प्रजासत्ताक दिनाची परेड टिव्हीवर पाहते. आता मी स्वतः या परेडचा एक भाग बनणार आहे. ही माझ्यासाठी गर्वाची बाब आहे. '' भावना घनश्यामपुरच्या प्रखंडच्या बाऊर या गावातील रहिवासी आहे. तिचे वडिल इंजिनीअर असून रिफायनरी टाऊनशिपमध्ये सेवा  पुरवतात. भावनाने आपले संपूर्ण शिक्षण बरौनी रिफाइनरी डीएवी पब्लिक स्कूल मधून पूर्ण केले.  त्यानंतर बंगलुरूच्या बीएमएस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून मेडिकल इलेक्ट्रॉनिक्समध्ये इंजीनियरिंगची पदवी मिळवली. कमाल! ट्रेनमध्ये थ्री इडियट्सचा कारनामा; व्हिडीओ कॉलवर डॉक्टरांशी बोलत केली महिलेची डिलिव्हरी

फ्लायपास्टमध्ये समावेश असलेल्या ४२ विमानांपैकी १५ लढाऊ विमाने, ५ वाहतूक विमाने, १७ हेलिकॉप्टर्स, १ व्हिंटेज आणि ४ सैन्य हेलिकॉप्टर्स असतील. प्रजासत्ताक दिनी राजपथावरील संचलनात हवाई दलाच्या पथकात ४ अधिकारी आणि ९६ हवाई योद्ध्यांचाही समावेश असणार आहे. कमालच केली राव! नवरा नवरीला नातेवाईकांनी आहेर पाठवावा म्हणून कुटुंबानं पत्रिकेत केला जुगाड

Web Title: Bhavna kant will be the first female firefighter pilot to attend the republic day parade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.