भवानीपूर: प्रचाराच्या शेवटच्या दिवशी दिलीप घोष यांच्यावर हल्ला; सुरक्षा रक्षकांनी काढले पिस्तूल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2021 02:26 PM2021-09-27T14:26:58+5:302021-09-27T14:28:56+5:30
West Bengal by election: भाजपा आणि तृणमूल काँग्रेसच्या दोन्ही बाजुने एकमेकांवर हल्ला केल्याचा आरोप केला जात आहे. भाजपाने सांगितले की, त्यांचे नेते आणि कार्यकर्ते भवानीपूरमध्ये प्रचार करत होते. त्यावेळी टीएमसीच्या कार्यकर्तांनी धक्काबुक्की केली.
पश्चिम बंगालच्या (west bengal) मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांना जर मुख्यमंत्री पद टिकवायचे असेल तर भवानीपूरहून पोटनिवडणूक जिंकणे गरजेचे आहे. विधानसभा निवडणुकीत पराभवाची धूळ चाखलेल्या ममतांना पुन्हा हरवण्यासाठी भाजपाने मोठी ताकद भवानीपूर मतदारसंघात झोकली होती. आज प्रचाराचा शेवटचा दिवस असताना भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष दिलीप घोष यांच्यावर हल्ला झाला आहे. परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी त्यांच्या सुरक्षा रक्षकांना पिस्तूल काढावी लागल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. (Bhabanipur bypoll: Ruckus during BJP campaign, Dilip Ghosh’s security men pull out guns)
भाजपा आणि तृणमूल काँग्रेसच्या दोन्ही बाजुने एकमेकांवर हल्ला केल्याचा आरोप केला जात आहे. भाजपाने सांगितले की, त्यांचे नेते आणि कार्यकर्ते भवानीपूरमध्ये प्रचार करत होते. त्यावेळी टीएमसीच्या कार्यकर्तांनी धक्काबुक्की केली. भाजपा खासदारासोबतही गैरप्रकार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. टीएमसी एवढी घाबरलीय कशाला? नंदीग्राममध्ये झालेल्या पराभवाचा राग टीएमसी इथे काढत आहे.
If @MamataOfficial and @abhishekaitc are so much confident of winning Bhawanipur by-poll by 1 lac margin, then why this kind of hooliganism is going on in the area?@BJP4Bengal leaders are being gheraoed. Why?
— Arjun Singh (@ArjunsinghWB) September 27, 2021
Is she fearing a repeat of Nandigram in Bhowanipur too?@ECISVEEPpic.twitter.com/cSB181b3Cp
दिलीप घोष यांनी म्हटले की, लढाई मोठी आहे. टीएमसी घाबरलीय. यामुळे ते आता मारहाणीवर आले आहेत. भाजपा खासदार अर्जुन सिंह प्रचार करत होते. तेव्हा टीएमसीचे काही लोक त्यांच्या मागे लागले. गो बॅकचे नारे देत होते. त्यांना धक्काबुक्की करून त्या भागातून जाण्यास भाग पाडले.
नंदीग्राम मतदार संघात झाला होता ममतांचा पराभव -
याचवर्षी एप्रिल-मे महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत टीएमसीच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी नंदीग्राममधून निवडणूक लढली होती. यासाठी त्यांनी आपला पारंपरिक भवानीपूर मतदारसंघ सोडला होता. मात्र, नंदीग्राममध्ये त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. येथे सुवेंदू अधिकारी यांनी त्यांचा पराभव केला. यापूर्वी सुवेंदू अधिकारी टीएमसीमध्येच होते.
ममता बॅनर्जींना 5 नोव्हेंबरपर्यंत जिंकून विधानसभेत पोहोचणे आवश्यक -
दरम्यान, ममता बॅनर्जींना मुख्यमंत्री पदावर टिकून राहण्यासाठी ही पोटनिवडणूक जिंकणे आवश्यक आहे. नंदीग्राममध्ये सुवेंदू अधिकारी यांच्याकडून पराभूत होऊन मुख्यमंत्री झालेल्या ममता बॅनर्जी यांना ५ नोव्हेंबरपर्यंत आमदार होणे आवश्यक आहे. अन्यथा त्यांना मुख्यमंत्रीपद सोडावे लागेल. ममता बॅनर्जी यांनी नंदीग्रामच्या निवडणूक निकालाला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. मात्र, यावर पुढील सुनावणी १५ नोव्हेंबरला होणार आहे.