भीम आर्मी हे तर भाजपाचे प्रॉडक्ट - मायावती

By admin | Published: May 25, 2017 05:37 PM2017-05-25T17:37:45+5:302017-05-25T17:41:19+5:30

उत्तर प्रदेशमधील सहारनपूरमध्ये पसरलेल्या जातीय तणावाच्या पार्श्वभूमीवर भीम आर्मी चर्चेत आली आहे. मात्र ही भीम आर्मी हे

The Bhim Army is BJP's product - Mayawati | भीम आर्मी हे तर भाजपाचे प्रॉडक्ट - मायावती

भीम आर्मी हे तर भाजपाचे प्रॉडक्ट - मायावती

Next
ऑनलाइन लोकमत 
नवी दिल्ली, दि. 25 -  उत्तर प्रदेशमधील सहारनपूरमध्ये पसरलेल्या जातीय तणावाच्या पार्श्वभूमीवर भीम आर्मी चर्चेत आली आहे. मात्र ही भीम आर्मी हे भाजपाचे अपत्य असून तिचा बसपाशी काहीही संबंध नाही, असे बसपा प्रमुख मायावती यांनी स्पष्ट केले आहे.एका गोपनीय अहवावालात भीम आर्मी ही बसपा आणि मायावतींचे बंधू आनंद कुमार यांच्याशी संबंधित असल्याचे वृत्त पसरले होते. 
 
या आरोपांबाबत बोलताना मायावती म्हणाल्या, "माझे बंधू तसेच पक्षाच्या अन्य वरिष्ठ नेत्यांचा भीम आर्मीशी काहीही संबंध नाही.  बसपा या आरोपांचे खंडन करते. भीम आर्मी ही पूर्णपणे भाजपाचे प्रॉडक्ट असल्याचे सहारनपूरमधील भाजपा कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे."
 
भीम आर्मी संबंधीच्या गोपनीय अहवालात बीएसपीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि मायावतींचे बंधू आनंद कुमार यांनी भीम आर्मीला निधी पुरवल्याची माहिती नमूद करण्यात आली होती. उघड झालेल्या कागदपत्रांमध्ये या संघटनेचे प्रमुख चंद्रशेखर यांच्याबाबतही माहिती देण्यात आली आहे. चंद्रशेखर हे पेशाने वकील असल्याचे त्यात म्हटले आहे.  
 
 ( सहारनपूर हिंसेसाठी BJP-RSS जबाबदार- मायावती
 
 
दरम्यान, सहारनपूरमधील वातावरण अद्यापही  तणावपूर्ण आहे. तसेच भीम आर्मी राज्य पोलिसांसाठी आव्हान बनली   आहे.  मंगळवारी बसपा प्रमुख मायावती यांनी सहारनपूरचा दौरा केल्यानंतर बडगाव विभागात पुन्हा हिंसाचार उफाळला. त्यानंतर हा हिंसाचार हळुहळू बाकीच्या गावांमध्येही पोहोचला. वाढत्या हिंसाचारामुळे राज्यात हाय अॅलर्ट घोषित करण्यात आला आहे. सहारनपूरमध्ये पुन्हा हिंसाचार उफाळल्याने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ नाराज झाले असून, परिस्थितीचा कठोरपणे सामना करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.  

Web Title: The Bhim Army is BJP's product - Mayawati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.