भीम आर्मी प्रमुख चंद्रशेखर आझाद यांना दिल्लीत अटक; आंदोलनाला हिंसक वळण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2019 12:01 PM2019-08-22T12:01:28+5:302019-08-22T12:01:51+5:30
रविदास मंदिर तोडण्याच्या विरोधात रामलीला मैदानात बुधवारी सायंकाळी दलित आंदोलक मोठ्या प्रमाणावर जमले होते.
नवी दिल्ली : येथील रविदास मंदिर अनधिकृत असल्याचे सांगत तोडण्याची कारवाई करण्यावरून रामलीला मैदानात भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांकडून रामलीला मैदानात आंदोलन सुरू होते. यावेळी दगडफेक करण्यात आल्याने त्यांना रोखण्यासाठी पोलिस बळाचा वापर करण्यात आला. याचबरोबर भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांना अटक करण्यात आली आहे.
रविदास मंदिर तोडण्याच्या विरोधात रामलीला मैदानात बुधवारी सायंकाळी दलित आंदोलक मोठ्या प्रमाणावर जमले होते. हजारो लोकांनी तोडलेल्या मंदिराकडे कूच करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी या जमावाला रोखण्याचा प्रयत्न केला तेव्हा पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. या दरम्याने पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. यामुळे संतापलेल्या आंदोलकांनी रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांची तोडफोड करण्यास सुरुवात केली. तुगलकाबाद रोडवर 100 हून अधिक गाड्यांच्या काचा फोडण्यात आल्या.
आंदोलक हिंसक होत असल्याचे पाहून पोलिसांनी हवेत गोळीबार केला तसेच अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. यानंतर लाठीचार्जही करण्यात आला. यामध्ये काही लोक जखमी झाले आहेत. पोलिसांनी रात्री उशिरा भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांच्यासह अन्य काही कार्यकर्त्यांना अटक केली. यामुळे तुगलकाबादला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे.
Exclusive footage of police shelling tear gas and lathicharging Dalit protesters as they were marching towards the demolition site of Ravidas temple in Tughlaqabad. This was happening in Delhi while all the media flocked to Chidambaram’s house.https://t.co/1uTLPwRnwQ@TheQuintpic.twitter.com/BycWVpTMVy
— Asmita Nandy (@NandyAsmita) August 21, 2019
दरम्यान, सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रामलीला मैदानामध्ये सायंकाळी 5 च्या सुमारास जवळपास 8 ते 10 हजार लोक जमा झाले होते. हे लोक मथुरा रोडवरून कालकाजी मंदिर, गोविंदपूरी मेट्रो स्थानकच्या मार्गाने तुगलकाबादच्या टी पॉईंटवर पोहोचले. तेथे पोलिसांना रस्ता अडविला होता. तसेच पाण्याचा मारा करण्यासाठी फायरब्रिगेडच्या गाड्या तैनात केल्या होत्या. पोलिसांनी पुढे न जाण्याचे आवाहन करताच जमावातील काहींनी दगडफेक करण्यास सुरूवात केली.