आरक्षणाच्या मुद्द्यावरून चंद्रशेखर आझाद यांनी भागवतांना दिलं खुल्या चर्चेचं आव्हान 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2019 10:34 AM2019-08-21T10:34:28+5:302019-08-21T10:51:12+5:30

आरक्षणाच्या मुद्द्यावरून भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद यांनी मोहन भागवत यांना खुल्या चर्चेचं आव्हान दिलं आहे.

bhim army leader chandrashekhar azad challenges mohan bhagwat to open debate on reservation | आरक्षणाच्या मुद्द्यावरून चंद्रशेखर आझाद यांनी भागवतांना दिलं खुल्या चर्चेचं आव्हान 

आरक्षणाच्या मुद्द्यावरून चंद्रशेखर आझाद यांनी भागवतांना दिलं खुल्या चर्चेचं आव्हान 

Next
ठळक मुद्देआरक्षणाच्या मुद्द्यावरून भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद यांनी मोहन भागवत यांना खुल्या चर्चेचं आव्हान दिलं आहे. जातिव्यवस्था संपवण्यासंदर्भात चर्चेमधून संवाद होणं गरजेचं असल्याचं देखील आझाद यांनी म्हटलं आहे.सरकारने आरक्षण रद्द करण्याचा प्रयत्न केला तर लोक रस्त्यावर उतरतील - चंद्रशेखर आझाद

नवी दिल्ली - देशातील आरक्षण व्यवस्थेबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भूमिकेवर नेहमीच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असते. दरम्यान, सरसंघचालक मोहन भागवत यांनी आरक्षणाबाबत पुन्हा एकदा वक्तव्य केलं आहे. त्यानंतर आता आरक्षणाच्या मुद्द्यावरून भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद यांनी मोहन भागवत यांना खुल्या चर्चेचं आव्हान दिलं आहे. तसेच जातिव्यवस्था संपवण्यासंदर्भात चर्चेमधून संवाद होणं गरजेचं असल्याचं देखील आझाद यांनी म्हटलं आहे.

चंद्रशेखर आझाद यांनी 'आरक्षणाच्या विरोधात असणाऱ्यांमध्ये चर्चा झाली पाहिजे असं भागवत यांना वाटतं. प्रसारमाध्यमं आणि संबंधित पक्षांच्या समोर मी त्यांना या मुद्द्यावर चर्चा करण्याचे आव्हान देतो. जातिव्यवस्थेमुळे आम्हाला जे काही सहन करावं लागतं ते आम्हाला मांडायचे आहे. भागवत यांनी चर्चेला आलं पाहिजे. स्वातंत्र्यानंतर 72 वर्षांनी 54 टक्के दलितांकडे स्वत: च्या मालकीची जमीन नाही आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आरक्षण व्यवस्थेबद्दल चर्चेचा मुद्दा मांडून आपली दलितविरोधी मानसिकता दाखवून दिली आहे' असं म्हटलं आहे. 

'भागवत यांनी जातीव्यवस्था संपवण्याचा मुद्दा मांडला असता तर भीम आर्मीने त्यांचं समर्थन केलं असतं. जातीव्यवस्थेने देशाला पोखरुन ठेवले आहे. भागवत यांनी यावर चर्चा करायला हवी. सरकारने आरक्षण रद्द करण्याचा प्रयत्न केला तर लोक रस्त्यावर उतरतील' असं देखील चंद्रशेखर आझाद यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. मोहन भागवत यांनी एका कार्यक्रमात आरक्षणाचे समर्थक आणि विरोधकांनी याविषयी सौहार्दपूर्ण वातावरणात चर्चा करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केलं होतं. 

एका कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना भागवत यांनी 'जे लोक आरक्षणाच्या बाजूने आहेत आणि जे विरोधात आहेत, अशांनी याविषयी सौहार्दपूर्ण वातावरणात चर्चा केली पाहिजे. या संदर्भात मी याआधीही वक्तव्य केले होते. मात्र त्यावेळी खूप विवाद होऊन मूळ मुद्दा भरकटला होता. जे आरक्षणाच्या बाजूने आहेत त्यांनी आरक्षणाच्या विरोधात असणाऱ्यांचे हित विचारात घेऊन बोलले पाहिजे. तसेच जे आरक्षणाच्या विरोधात आहेत त्यांनी आरक्षणाच्या समर्थकांची बाजू समजून घेतली पाहिजे' असं म्हटलं होतं. 
 

Web Title: bhim army leader chandrashekhar azad challenges mohan bhagwat to open debate on reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.