'भीम अॅप' आता आयफोनवर सुद्धा उपलब्ध

By admin | Published: February 13, 2017 04:16 PM2017-02-13T16:16:39+5:302017-02-13T16:20:16+5:30

डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉंच केलेले भारत इंटरफेस फॉर मनी म्हणजेच भीम अॅप आता आयफोन वापरणा-यांसाठी सुद्धा उपलब्ध करण्यात आले आहे.

'Bhima App' is also available on the iPhone now | 'भीम अॅप' आता आयफोनवर सुद्धा उपलब्ध

'भीम अॅप' आता आयफोनवर सुद्धा उपलब्ध

Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 13 - डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉंच केलेले भारत इंटरफेस फॉर मनी म्हणजेच भीम अॅप आता आयफोन वापरणा-यांसाठी सुद्धा उपलब्ध करण्यात आले आहे. 
आयफोन वापरणा-यांनी आपल्या फोनमधील अॅपल अॅप स्टोअरमधून भीम अॅप डाऊनलोड केल्यानंतर भीम अॅपच्यामाध्यमातून त्यांना मार्केटमध्ये व्यवहार करणे सोपे आणि अगदी जलद होईल, असे नॅशनल पेमेन्ट कार्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने म्हटले आहे. 
देशातील जवळजवळ 100% स्मार्टफोन युजर्संसह आयओएस प्लॅटफॉर्मवर सुद्धा भीम अॅपचा वापर होणार आहे. आम्हाला खात्री आहे की, ग्राहक प्रत्येक क्षेत्रात भीम अॅपचा डिजिटल व्यवहार करण्यासाठी वापर करतील , असे नॅशनल पेमेन्ट कार्पोरेशन ऑफ इंडियाच्या एका अधिका-यांने सांगितले. 
भीम अॅप हे नॅशनल पेमेन्ट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने तयार केले असून यामध्ये सध्या इंग्रजी आणि हिंदी या दोन भाषांचा पर्याय सध्या उपलब्ध करुन देण्यात आला आहे.
 

 

Web Title: 'Bhima App' is also available on the iPhone now

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.