"भीम" अॅप 16 दशलक्ष युझर्सनी केलं डाऊनलोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 07:24 PM2017-07-24T19:24:34+5:302017-07-24T19:25:50+5:30

देशात डिजिटल व्यवहाराला चालना मिळावी म्हणून केंद्र सरकारने सुरु केलेलं ‘भारत इंटरफेस फॉर मोबाईल’ अर्थात ‘भीम’ हे अॅप सर्वात लोकप्रिय ठरलं आहे.

"Bhima" app downloaded to 16 million users | "भीम" अॅप 16 दशलक्ष युझर्सनी केलं डाऊनलोड

"भीम" अॅप 16 दशलक्ष युझर्सनी केलं डाऊनलोड

Next
>
ऑनलाइन लोकमत
 
नवी दिल्ली, दि. 24 - देशात डिजिटल व्यवहाराला चालना मिळावी म्हणून केंद्र सरकारने सुरु केलेलं  ‘भारत इंटरफेस फॉर मोबाईल’ अर्थात ‘भीम’ हे अॅप सर्वात लोकप्रिय ठरलं आहे.  ‘भीम’ अॅप लॉंच झाल्यानंतर आत्तापर्यंत 16 दशलक्ष युझर्सनी डाऊनलोड केलं आहे. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने हे लॉन्च तयार केलं आहे. 
आत्तापर्यंत 16 दशलक्ष युजर्सनी भीम अॅप डाऊनलोड केलं आहे. म्हणजे, एकप्रकारे देशात डिजिटल आणि कॅशलेस व्यवहार होत असल्याचे दिसून येते. ही एक उल्लेखनीय कामगिरी आहे, असे नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) चे एमडी आणि सीईओ ए. पी. होटा यांनी सांगितले. दरम्यान, लवकरच ‘भीम’ अॅपचं नवीन व्हर्जन येणार आहे. 
कॅशलेस अर्थात रोकडरहित व्यवहार अधिक सहज आणि सोप्या पद्धतीनं व्हावेत या दृष्टीने  ‘भीम’ अॅपची निर्मिती करण्यात आली आहे.  नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने हे अॅप तयार केलेलं हे अॅप गेल्या वर्षी म्हणजेच डिसेंबर 2016 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लॉन्च करण्यात आलं होतं. त्यावेळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना हे अॅप समर्पित असल्याचं म्हणत त्यांच्या भीमराव नावापासूनच या अॅपचं नामकरण भीम असं करण्यात आल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली होती. 
 
कसं काम करतं हे  ‘भीम’ अॅप ?
- अँड्रॉईड स्मार्टफोनवर लॉन्च अॅप BHIM प्ले स्टोअरवरुन डाऊनलोड करा.
- त्यानंतर तुमचं बँक खातं आणि त्यासोबत यूपीआय पिन तयार करा. (हा पर्याय अप डाऊनलोड करतानाचा विचारला जातो)
-  तुमचा मोबाईल नंबर हाच तुमचा पेमेंट अड्रेस असेल.
-  मोबाईल क्रमांक नोंदवल्यानंतर भीम अॅपचा वापर करता येईल.
-  इंग्रजी आणि हिंदी या दोन भाषांचा पर्याय या अॅपमध्ये सध्या उपलब्ध आहे.
 

Web Title: "Bhima" app downloaded to 16 million users

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.