भीमाशंकर परिसर विकास अराखडयाच्या

By admin | Published: July 31, 2015 10:25 PM2015-07-31T22:25:18+5:302015-07-31T22:25:18+5:30

पहिल्या टप्प्यासाठी १९.९३ कोटी रुपये देणार अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार

Bhimashankar campus development plan outline | भीमाशंकर परिसर विकास अराखडयाच्या

भीमाशंकर परिसर विकास अराखडयाच्या

Next
िल्या टप्प्यासाठी १९.९३ कोटी रुपये देणार अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार
घोडेगाव (वार्ताहर) -
भीमाशंकर परिसर विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यासाठी आवश्यक असलेल्या १९.९३ कोटी रुपयांच्या मागणीबाबत विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेऊन चर्चा केली. या वेळी अर्थमंत्र्यांनी पहिल्या टप्प्यासाठी मागणी करण्यात आलेली रक्कम देण्याचे कबूल केले व श्रावण महिन्यात स्वत: भीमाशंकरला भेट देऊन परिसराची पाहणी करणार असल्याचे सांगितले.
आंबेगाव व शिरूर या तालुक्यांतील विकासकामांबाबत व महत्त्वाच्या सुरू असलेल्या प्रकल्पांसाठी आवश्यक असलेल्या निधीबाबत विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवर यांच्यासमवेत बैठक घेऊन चर्चा केली. या वेळी विशेष कार्य अधिकारी बी. एस. भोर, सार्वजनिक बांधकाम खात्याचे उपअभियंता एस. बी. देवढे, एस. आर. पाटील हे उपस्थित होते.
या चर्चेत भीमाशंकर परिसर विकास आराखड्याबाबत सविस्तर चर्चा झाली. हा आराखडा दोन टप्प्यांत करण्यात आला असून, पहिल्या टप्प्यात मंदिराकडे जाणार्‍या पायर्‍यांवरील छत, मंदिराच्या मागून येणारा आपत्कालीन मार्ग, भक्तांसाठी उंचावरील दर्शन मार्ग, मंदिरासमोरील गॅलरीचे नूतनीकरण, बसस्थानकाची संरक्षक भिंत व काँक्रिटीकरण, भक्त निवासासमोरील संरक्षक भिंत व अंतर्गत काँक्रीट रस्ते, पाथवे, डिंभे गार्डनची उर्वरित कामे या कामांसाठी ११९३.५३ लक्ष रुपयांची मागणी करण्यात आली. मागणी करण्यात आलेली पूर्ण रक्कम देण्याचे या वेळी अर्थमंत्र्यांनी कबूल केले.
तसेच, श्रावण महिन्यात भीमाशंकरला पाहणी करण्यासाठी येणार असून, त्यावेळी बैठक घेऊन दुसर्‍या टप्प्यातील कामांनाही गती देऊ असे त्यांनी सांगितले. तसेच, भीमाशंकरसाठी खासगी वास्तुविशारद नेमून त्यांच्याकडून सविस्तर नियोजन केले जाईल व त्याप्रमाणे भीमाशंकरचा विकास करू, असेही त्यांनी सांगितले.
31072015-ॅँङ्मि-03 – भीमाशंकर परिसर विकास आराखड्याबाबत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवर यांच्याशी चर्चा करताना दिलीप वळसे-पाटील. या वेळी उपस्थित उपअभियंता एस. बी. देवढे.
31072015-ॅँङ्मि-04 – भीमाशंकर परिसर विकास अराखड्याबाबत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवर यांना माहिती देताना दिलीप वळसे-पाटील या वेळी उपस्थित विशेष कार्यकारी अधिकारी बी. एस. भोर.
31072015-ॅँङ्मि-05 – भीमाशंकर मंदिर.

Web Title: Bhimashankar campus development plan outline

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.