भोगेश्वर कालवश, सर्वात लांब दात असलेला हत्ती अशी होती ओळख, सोशल मीडियावर प्राणीप्रेमी भावूक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2022 07:04 PM2022-06-13T19:04:07+5:302022-06-13T19:04:28+5:30
Bhogeshwar Death: प्राण्यांवर प्रेम करणाऱ्यांसाठी दु:खद बातमी समोर आली आहे. आशियातील सर्वात लांब दात असलेला हत्ती भोगेश्वर याचा मृत्यी झाला आहे. कर्नाटकमधील बांदीपूर टायगर रिझर्व्हमधील गुंद्रे रेंजमध्ये शनिवारी तो मृतावस्थेत सापडला.
बंगळुरू - प्राण्यांवर प्रेम करणाऱ्यांसाठी दु:खद बातमी समोर आली आहे. आशियातील सर्वात लांब दात असलेला हत्ती भोगेश्वर याचा मृत्यी झाला आहे. कर्नाटकमधील बांदीपूर टायगर रिझर्व्हमधील गुंद्रे रेंजमध्ये शनिवारी तो मृतावस्थेत सापडला.
भोगेश्वरचा मृत्यू हा नैसर्गिक कारणांमुळे झाल्याचे सांगण्यात येत आहे. काबिनी बॅकवॉटरमध्ये हा हत्ती पर्यटकांसाठी मुख्य आकर्षण होता. तसेच भोगेश्वर याला आशियातील सर्वात लांब दात असलेला हत्ती म्हणून ओळखले जात होते. भोगेश्वर याला मिस्टर काबिनी म्हणून ओळखले जात होते. त्याचा मृत्यू तीन-चार दिवसांपूर्वी झाला असावा, असा अंदाज आहे. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार भोगेश्वरचे दात हे २.५४ मीटर आणि २.३४ मीटर लांब होते.
It’s distressing to know the passing away of #Bhogeshwara, 60 years old elephant famously known as Mr. Kabini.
— Shobha Karandlaje (@ShobhaBJP) June 12, 2022
The elephant had drawn the attention of the tourists & nature enthusiasts for his mammoth tusks.
He breathed his last at Gundre range of the Bandipur Tiger Reserve. pic.twitter.com/P5fMjiimEb
जेव्हा या हत्तीच्या मृत्यूबाबतची बातमी सोशल मीडियावर पसरली तेव्हा लोकांना आपापल्या परीने भोगेश्वरला श्रद्धांजली वाहण्यास सुरुवात केली. जंगलात या हत्तीचं दिसणं हे शुभ मानलं जात असे. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याणमंत्री शोभा करंदलाजे यांनीही या हत्तीला श्रद्धांजली वाहिली आहे.