भोजपुरी अभिनेते पवन सिंहची भाजपमधून झाली हकालपट्टी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2024 01:53 PM2024-05-23T13:53:53+5:302024-05-23T13:54:25+5:30
या प्रकरणी विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव म्हणाले की, हा भाजपचा डाव आहे. भाजपला उपेंद्र कुशवाह यांना हरवायचे आहे आणि आतून भाजप पवन सिंह यांना मदत करीत आहे.
एस.पी. सिन्हा -
पाटणा (बिहार) : काराकट लोकसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढविल्याबद्दल भाजप बिहार शाखेने प्रसिद्ध भोजपुरी अभिनेते पवन सिंह यांना राज्याच्या पक्षातून निलंबित केले आहे. त्यावर “महाभारतात अभिमन्यू एकटा होता. कृष्ण आणि पांडव असतानाही त्याला चक्रव्यूहात घेरत राक्षसांनी मारले होते. आजही अभिमन्यू युद्धात एकटाच आहे; पण, जनता त्याच्यासोबत आहे. आम्ही आमचे कर्तव्य पार पाडू आणि काराकटला नवीन बनवू,” असे पवन सिंह यांनी म्हटले आहे.
या प्रकरणी विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव म्हणाले की, हा भाजपचा डाव आहे. भाजपला उपेंद्र कुशवाह यांना हरवायचे आहे आणि आतून भाजप पवन सिंह यांना मदत करीत आहे. दुसरीकडे, जदयूचे प्रवक्ते जमा खान म्हणाले की, जर तुम्ही पक्षाच्या विरोधात काम केले तर तुमची निश्चितपणे हकालपट्टी केली जाईल. पवन सिंह यांना पक्षाने याआधी आसनसोलमधून लढविण्यास सांगितले होते, ज्याला त्यांनी नकार दिला होता.