वीज कंपनीचा भोंगळा कारभार...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 05:29 PM2021-03-10T17:29:38+5:302021-03-10T17:31:05+5:30

सायखेडा : वीज वितरण कंपनीमार्फत येणाऱ्या वीज बिलात दुरुस्ती खर्च, डीपी सुधीर खर्च आकारण्यात येतो, हजारो रुपये बिलाच्या माध्यमातून आकारणी होते, कंपनी मात्र आठ तास वीज देते. विजेच्या सोबत संबंधित डीपीला लागणारा दुरुस्तीचा खर्च देत नाही.

Bhongla management of power company ... | वीज कंपनीचा भोंगळा कारभार...

वीज कंपनीचा भोंगळा कारभार...

Next
ठळक मुद्दे वीज बील भरणा करण्याकडे शेतकऱ्यांची डोळे झाक

सायखेडा : वीज वितरण कंपनीमार्फत येणाऱ्या वीज बिलात दुरुस्ती खर्च, डीपी सुधीर खर्च आकारण्यात येतो, हजारो रुपये बिलाच्या माध्यमातून आकारणी होते, कंपनी मात्र आठ तास वीज देते. विजेच्या सोबत संबंधित डीपीला लागणारा दुरुस्तीचा खर्च देत नाही.

वर्षानुवर्षे डीपीचे फ्युज बदलले नाहीत. अनेक वर्षांपासून डीपी बसवलेली असल्यामुळे त्याचा पत्रा स्टड बोल्ट, केबल आणि डीपीमध्ये असणारे ऑइल खराब झाले आहे. गेली अनेक वर्षे या दुरुस्तीकडे वी वितरण कंपनीने पाठ फिरवली आहे. वायरमन जेव्हा डीपी बिघडते तेव्हाच येतात आणि शेतकऱ्यांकडून पैसे घेऊन डीपी बदलून देतात. वास्तविक हा सर्व खर्च संबंधित वीज वितरण कंपनीने करावयाचा आहे. यासाठी येणारा खर्च वीज बिल आकारणीमध्ये केला जातो. शिवाय सेवा देण्याची जबाबदारी संबंधित यंत्रणेची आहे.
लोडशेडिंग असल्यामुळे अनेक शेतकरी रात्री अपरात्री डीपीवर फ्युज बदल्यासाठी किंवा डिओ गेला तर तो टाकण्यासाठी डीपीवर येत असतात अंधार खूप असतो अशा वेळी जीवावर बाजी लावून सर्व दुरुस्ती करावी लागते, अशा वेळी अनेकांना विजेचा शॉक बसतो. अनेकांना प्राण गमवावा लागला आहे. वीज वितरण कंपनी केवळ बिल भरा असा आग्रह धरत असली तरी आपल्याला द्यावयाच्या सेवा मात्र विसरली असल्यामुळे शेतकरी वीज बिल भरताना लवकर तयार होत नाहीत.

शेतातील अनेक डीपी जवळ जाण म्हणजे जीवाशी खेळल्या सारखे आहे. त्यामुळे वीज वितरण कंपनीने अगोदर सर्व डीपीचे फ्युज बदलून द्यावे, तेथील पेटी बदलून द्यावी. नंतर वीज बिल भरण्याचा आग्रह धरावा
- गणेश मोगल, शेतकरी, भेंडाळी.
 

Web Title: Bhongla management of power company ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.