मोदींच्या हस्ते प्रकल्पांचे भूमिपूजन
By Admin | Published: July 23, 2016 05:11 AM2016-07-23T05:11:19+5:302016-07-23T05:11:19+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी गोरखपूर येथे भग्नावस्थेत असलेल्या खत प्रकल्पाच्या पुनरुज्जीवनाचे भूमिपूजन केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी गोरखपूर येथे भग्नावस्थेत असलेल्या खत प्रकल्पाच्या पुनरुज्जीवनाचे भूमिपूजन केले. त्याचप्रमाणे अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे (एम्स) भूमिपूजनही त्यांच्या हस्ते करण्यात आले. एम्स प्रकल्पावर १,0११ कोटी रुपये खर्च होणार आहेत. उत्तर प्रदेशातील नागरिकांना उच्च दर्जाची आरोग्यसेवा मिळावी यासाठी हा प्रकल्प उभा करण्यात येत असल्याचे सरकारच्या वतीने सांगण्यात आले. पुनरुज्जीवन करण्यात येत असलेला खत प्रकल्प फर्टिलायझर कॉर्पोरेशन आॅफ इंडिया लिमिटेड (एफसीआयएल) या सरकारी कंपनीचा आहे. १९९0 च्या दशकापासून हा प्रकल्प बंद असून, त्याची अवस्था भग्नावशेषासारखी झाली होती. ६ हजार कोटी रुपये खर्च करून हा प्रकल्प पुनरुज्जीवित करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी एनटीपीसी, कोल इंडिया आणि इंडियन आॅईल कॉर्पोरेशन यांनी संयुक्त उद्यम स्थापन केला आहे. या प्रकल्पातून ४ हजार लोकांना रोजगार मिळणार आहे.