भयावह! Black Fungus च्या रुग्णांचा काढावा लागतोय जबडा; सडू लागली तोंडाची हाडं
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2021 05:43 PM2021-07-02T17:43:45+5:302021-07-02T17:52:06+5:30
Black Fungus Patients : ब्लॅक फंगसमधून बरे झालेल्या रुग्णांची प्रकृती ही आणखी बिघडत चालली आहे. तोंडाची हाडं सडू लागल्याने रुग्णांचा जबडा काढावा लागत असल्याची भयंकर घटना समोर आली आहे.
नवी दिल्ली - देशात ब्लॅक फंगसने थैमान घातले आहे. रुग्णांच्या संख्येने तब्बल 40 हजारांचा टप्पा पार केला आहे. 'ब्लॅक फंगस' म्हणजेच "म्युकोरमायकोसिस" हे एक गंभीर इन्फेक्शन आहे. ज्याचा परिणाम नाक, डोळ्यांवर होतो आणि मेंदूपर्यंतही हे इन्फेक्शन पोहोचतं. या इन्फेक्शनमुळे रुग्णांचे डोळेही काढावे लागत आहेत. अशातच आता आणखी एक धक्कादायक माहिती पुन्हा एकदा समोर आली आहे. मध्य प्रदेशच्या आरोग्य विभागासमोर नवीन समस्या निर्माण झाली आहे. ब्लॅक फंगसमधून बरे झालेल्या रुग्णांची प्रकृती ही आणखी बिघडत चालली आहे. तोंडाची हाडं सडू लागल्याने रुग्णांचा जबडा काढावा लागत असल्याची भयंकर घटना समोर आली आहे.
ब्लॅक फंगसमधून बरं झालेल्या रुग्णांना ऑस्टियोमोलाइटिस (Osteomyelitis) हा दुर्मिळ आजार बळावला आहे. यामुळे रुग्णांचा तोंडाच्या आतील वरील भाग आणि जबड्याची हाडं सडू लागली आहे. भोपाळच्या एका रुग्णालयात ऑस्टिओमोलाइटिसची 20 पेक्षा जास्त प्रकरणं आढळून आली आहे. त्यापैकी कित्येकांचे जबडे काढून टाकावे लागले आहेत. हमीदिया रुग्णालयातील डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, हा एक अत्यंत दुर्मिळ आजार आहे. ब्लॅक फंगसमुळे रुग्णाच्या तोंडाच्या आतील वरील भाग आणि जबड्यांच्या रक्तपेशींमध्ये रक्ताच्या गुठळ्या होतात. यामुळे हाडांपर्यंत जाणारा रक्तपुरवठा थांबतो आणि मग हाडं सडू लागतात.
चिंता वाढली! ब्लॅक फंगसचे थैमान, सर्जरीनंतरही वेगाने पसरत असल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण#CoronavirusIndia#CoronaSecondWave#BlackFungus#mucormycosishttps://t.co/eg8QqTY9Kp
— Lokmat (@MiLOKMAT) July 2, 2021
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, हा नवा आजार नाही. पण कित्येक वर्षात याची एक-दोन प्रकरणं पाहायला मिळायची. अचानक ब्लॅक फंगसची प्रकरणं वाढली आणि सोबतच या आजाराच्या प्रमाणातही वाढ होते आहे. तोंडातील ही सडलेली हाडं ऑपरेशन करून काढावी लागतात. जबडाही काढून टाकावा लागतो. रुग्णांना खाण्यापिण्यातही त्रास होतो. जबड्याच्या वरील भागात सूज, दात अचानक हलू लागणं, दातांमध्ये वेदना असा त्रास होतो. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. रुग्णांवर सर्जरी केल्यानंतरही Black Fungus चा पुन्हा धोका असल्याची आता माहिती मिळत आहे. यामुळे डॉक्टरही हैराण झाले असून वेळीच सावध असं सांगण्यात येत आहे. सर्जरीनंतरही ब्लॅक फंगस वेगाने पसरत आहे.
ब्लॅक फंगसचे थैमान! इन्फेक्शनमुळे रुग्णांचे काढावे लागताहेत डोळे#CoronaVirusUpdates#mucormycosis#BlackFungus#Indiahttps://t.co/fh0i0os1T1
— Lokmat (@MiLOKMAT) June 30, 2021
एसएमएस मेडिकल कॉलेजच्या म्युकोरमायकोसिस बोर्डच्या रिसर्चमध्ये याबाबत मोठा खुलासा करण्यात आला आहे. रिसर्चनुसार, एसएमएस रुग्णालयात आतापर्यंत 27 रुग्ण आढळून आलेत ज्यांना सर्जरीनंतर पुन्हा ब्लॅक फंगसची लागण झाली आहे. तसेच रुग्णालयात आतापर्यंत ब्लॅक फंगसचे 450 रुग्ण आढळून आले आहेत. त्यातील 410 जणांवर सर्जरी करण्यात आली आहे. ज्यामध्ये 25 रुग्ण असे होते. ज्यांच्या मेंदूपर्यंत ब्लॅक फंगस पोहोचला होता. ब्लॅक फंगसमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. य़ावर असणारं मुख्य औषध एम्फोटेरिसिनची कमतरता असल्याने चिंता वाढली असल्याची माहिती मिळत आहे.
Fact Check : लोकांमध्ये भीतीचे आणि संभ्रमाचे वातावरण#coronavirus#CoronavirusIndia#CoronaUpdatesInIndia#COVID19India#LockDownhttps://t.co/L2okBIhANZ
— Lokmat (@MiLOKMAT) July 1, 2021