१८ कोटींच्या अपहारानंतर विश्वास झाला डळमळीत बीएचआर : २०१४ मधील वार्षिक सभेत उघड झाला अपहार

By admin | Published: November 27, 2015 09:33 PM2015-11-27T21:33:19+5:302015-11-27T21:33:19+5:30

जळगाव : भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) पतसंस्थेत ठेवी आणि भागभांडवलाची रक्कम वाढत असताना मनमानी कारभार सुरू झाला. त्यातूनच मग रोख रकमेची चोरी तसेच अपहाराचे प्रकार वाढू लागले. २०१३/१४ या आर्थिक वर्षात समोर आलेल्या १९ कोटी ४५ लाख चार हजार ८६१ रुपयांच्या अपहाराचा मुद्दा समोर आल्यानंतर ठेवीदारांमध्ये अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले आणि खर्‍या अर्थाने बीएचआरच्या डबघाईला सुरुवात झाली.

BHR: After the Rs 18 crore apathy, it was revealed in the annual meeting of BHR: Aphar | १८ कोटींच्या अपहारानंतर विश्वास झाला डळमळीत बीएचआर : २०१४ मधील वार्षिक सभेत उघड झाला अपहार

१८ कोटींच्या अपहारानंतर विश्वास झाला डळमळीत बीएचआर : २०१४ मधील वार्षिक सभेत उघड झाला अपहार

Next
गाव : भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) पतसंस्थेत ठेवी आणि भागभांडवलाची रक्कम वाढत असताना मनमानी कारभार सुरू झाला. त्यातूनच मग रोख रकमेची चोरी तसेच अपहाराचे प्रकार वाढू लागले. २०१३/१४ या आर्थिक वर्षात समोर आलेल्या १९ कोटी ४५ लाख चार हजार ८६१ रुपयांच्या अपहाराचा मुद्दा समोर आल्यानंतर ठेवीदारांमध्ये अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले आणि खर्‍या अर्थाने बीएचआरच्या डबघाईला सुरुवात झाली.
बीएचआर पतसंस्थेचा १९ वा वार्षिक अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. त्यात सादर करण्यात आलेल्या एकत्रित ताळेबंदमध्ये आर्थिक वर्षातील सर्व व्यवहार नमूद केले आहे.
दोन वर्षात १९ कोटी रुपयांचा अपहार
बीएचआर पतसंस्थेची आर्थिकस्थिती काही वर्षात मजबुत झाली. नियमित कर्जवसुली, ठेवीदारांना जादा मिळणारा व्याजदर यामुळे प्रत्येक वर्षी उलाढालीत वाढ होत होती. प्रत्येक वर्षी होणार्‍या प्रगतीमुळे ठेवीदारांची संख्या वाढतच होती. यासार्‍यात पतसंस्थेतील संचालक मंडळ व कर्मचार्‍यांची मनमानी सुरू झाली. २०१२/१३ या वर्षभरात संस्थेच्या विविध शाखांमध्ये एक कोटी ४६ लाख ६६ हजार २८ रुपयांचा अपहार झाला. अपहार करणार्‍यांविरोधात कारवाई करून त्याला प्रतिबंध बसविणे गरजेचे होते. मात्र दुसर्‍या वर्षी म्हणजे २०१३/१४ या वर्षात अपहाराचा हा आकडा १९ कोटी ४५ लाख चार हजार ८६१ रुपयांपर्यंत पोहचला. शासकीय लेखापरीक्षणानंतर या सर्व अपहाराची नोंद वार्षिक अहवालात करण्यात आली. संस्थेच्या सर्वसाधारण सभेत ही बाब उघड झाल्यानंतर ठेवीदारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली.
पुणे शाखेतील बेनामी व्यवहारामुळे संशय वाढला
बीएचआर पतसंस्थेच्या पुणे येथील एका शाखेत बेनामी खाते आणि व्यवहाराची बाब सहकार विभागाने केलेल्या चौकशीत उघड झाली. त्यातच वार्षिक अहवालातील १९ कोटींचा अपहार अशा एकामागून गैरव्यवहार आणि गैरव्यवस्थापनाच्या घटना समोर येऊ लागल्याने ठेवीदारांसोबतच कर्जदारांमध्ये संभ्रम निर्माण होऊ लागला. यासार्‍यात बीएचआर पतसंस्थेच्या आर्थिकस्थितीबाबत रोज नवनवीन बातम्या येत असल्याने कर्जदारांनी नियमित भरणा थांबविला तर ठेवीदारांचा पैशांसाठी तगादा सुरू झाला.

Web Title: BHR: After the Rs 18 crore apathy, it was revealed in the annual meeting of BHR: Aphar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.