महाराष्ट्राच्या सुपुत्राला जम्मू-काश्मीरमध्ये वीरमरण, गावात शोककळा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2020 02:57 PM2020-12-12T14:57:39+5:302020-12-12T14:58:50+5:30
सुरेश घुगे 2006 साली सैन्य दलात दाखल झाल्यानंतर मराठा ई बटालियन मध्ये कार्यरत होते. गुरुवारी रात्री डोंगरावर गस्त घालत असतांना पाय घसरून घुगे खाली पडून गंभीर जखमी झाले होते.
मनमाड (नाशिक) : जम्मू काश्मीरच्या नवसेरा सेक्टर मध्ये कर्तव्य बजावत असताना डोंगरावरून पाय घसरून मनमाडच्या अस्तगाव येथील जवान सुरेश घुगे यांना वीरमरण आले आहे. रात्री ९ वाजेच्या सुमारास ही घटना घडली असून त्यांच्या निधनाने वृत्त येताच मनमाडसह नांदगाव तालुक्यात शोककळा पसरली.
सुरेश घुगे 2006 साली सैन्य दलात दाखल झाल्यानंतर मराठा ई बटालियन मध्ये कार्यरत होते. गुरुवारी रात्री डोंगरावर गस्त घालत असतांना पाय घसरून घुगे खाली पडून गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर मिल्ट्री हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असतांना त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी आणि 9 वर्षाची मुलगी असा परिवार आहे. जवान घुगे यांच्या निधनानंतर गावात हळहळ व्यक्त करण्यात येत असून गावानं भारतमातेचा सुपुत्र गमावल्याची भावना व्यक्त होत आहे.