भूपेंद्र पटेल गुजरातच्या मुख्यमंत्रिपदी; १६ मंत्र्यांचाही मंत्रिमंडळात समावेश
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2022 05:58 AM2022-12-13T05:58:18+5:302022-12-13T05:58:36+5:30
शपथविधीनंतर पंतप्रधान जनतेसमोर नतमस्तक झाले. यानंतर त्यांनी पटेल यांच्या मंत्रिमंडळाची भेट घेऊन त्यांच्यासोबत छायाचित्रे काढली.
लोकमत न्यूज नेटवर्क
गांधीनगर : गुजरातचे १८ वे मुख्यमंत्री म्हणून ६० वर्षीय भूपेंद्र पटेल यांना सोमवारी येथील सचिवालयाच्या हेलिपॅड मैदानावर दुपारी दोन वाजता राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी शपथ दिली. याच सोहळ्यात १६ मंत्र्यांनीही शपथ घेतली. यामध्ये ११ माजी मंत्र्यांचा समावेश आहे.
पटेल यांच्या मंत्रिमंडळात ८ कॅबिनेट आणि तेवढेच राज्यमंत्री आहेत. दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होणारे ते पहिले पाटीदार नेते आहेत. शपथविधीनंतर पंतप्रधान जनतेसमोर नतमस्तक झाले. यानंतर त्यांनी पटेल यांच्या मंत्रिमंडळाची भेट घेऊन त्यांच्यासोबत छायाचित्रे काढली. त्यांनी विजय रूपाणी यांच्याशीही चर्चा केली. शपथविधी सोहळ्याला भाजपचे प्रमुख नेते, तसेच केंद्रीय मंत्री आणि पक्षाची सत्ता असलेल्या राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते.
हार्दिक पटेल मंत्रिपदापासून वंचित
नुकतेच भाजपमध्ये आलेले हार्दिक पटेल यांना भूपेंद्र पटेल यांच्या मंत्रिमंडळात स्थान मिळू शकले नाही. मंत्रिमंडळात घ्यायचे की नाही, याचा निर्णय पक्ष घेईल, कोणतीही जबाबदारी आली, तरी ती पार पाडील, असे हार्दिक यांनी सकाळीच सांगितले होते.
गुजरातचे १८ वे मुख्यमंत्री म्हणून ६० वर्षीय भूपेंद्र पटेल यांनी सोमवारी शपथ दिली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही उपस्थिती होती. शपथविधीपूर्वी मोदी यांनी गुजरातमध्ये मोठा रोड शो आयोजित केला होता, त्याला नागरिकांनी गर्दी केली होती.