भूपेंद्र यादव भाजपचे निवडणूक प्रभारी; महाराष्ट्रासाठी नियुक्ती जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2019 01:39 AM2019-08-10T01:39:19+5:302019-08-10T01:39:30+5:30

जावडेकर दिल्लीत, तोमर हरियाणात, माथुरांकडे झारखंड

Bhupendra Yadav in charge of BJP elections; Announcement of Appointment for Maharashtra | भूपेंद्र यादव भाजपचे निवडणूक प्रभारी; महाराष्ट्रासाठी नियुक्ती जाहीर

भूपेंद्र यादव भाजपचे निवडणूक प्रभारी; महाराष्ट्रासाठी नियुक्ती जाहीर

Next

- नितीन अग्रवाल 

नवी दिल्ली : भाजपने महाराष्ट्रासह चार राज्यांत होणाऱ्या विधानसभेच्या आगामी निवडणुकीची तयारी सुरू करून या चार राज्यांसाठी निवडणूक प्रभारींची नियुक्ती केली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी महाराष्ट्रासाठी भाजपचे सरचिटणीस भूपेंद्र यादव यांची निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती केली असून, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे दिल्लीचे निवडणूक प्रभारी म्हणून जबाबदारी सोपविली आहे.

हरियाणा, महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये या वर्षअखेर विधानसभेची निवडणूक होणार आहे. भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी दिल्लीची जबाबदारी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्यावर सोपविली आहे. लोकसभा आणि राजस्थान विधानसभा निवडणुकीतील त्यांची कामगिरी पाहूनच त्यांच्यावर ही जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांच्यासोबत केंद्रीय मंत्री हरदीप पुरी आणि नित्यानंद राय यांना सह-निवडणूक प्रभारी करण्यात आले आहे.

श्याम जाजू हे प्रदेश भाजपचे संघटन प्रभारी आणि तरुण चूघ राष्ट्रीय सचिवपदाची जबाबदारी सांभाळतील.
शेतकरीबहुल हरियाणात केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर हे निवडणूक प्रभारी असतील, तर उत्तर प्रदेशचे मंत्री भूपेंद्र सिंह हे सह-निवडणूक प्रभारी असतील.
झारखंडचे निवडणूक प्रभारी म्हणून भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष ओम प्रकाश माथूर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. माथूर हे उत्तर प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्राचे प्रभारी होते.

मौर्य सहप्रभारी
उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि कर्नाटकातील लक्ष्मण सेवादी यांना महाराष्टÑाचे सह-निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. भूपेंद्र यादव हे गुजरातचे निवडणूक प्रभारी होते. त्यांना महाराष्टÑातील राजकारणही चांगल्या प्रकारे माहिती आहे.
बिहारसह अनेक राज्यांत निवडणूक जिंकण्याच्या रणनीतीत भूपेंद्र यादव यांची महत्त्वाची भूमिका होती. महाराष्टÑातील उत्तर भारतीयांना आकर्षित करण्यासाठी केशव प्रसाद मौर्य यांच्यावर सह-निवडणूक प्रभारीपदाची जबाबदारी देण्यात आली असावी, असे मानले जाते.

Web Title: Bhupendra Yadav in charge of BJP elections; Announcement of Appointment for Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :BJPभाजपा