भूषण, यादव यांचा नवा पक्ष?
By admin | Published: April 1, 2015 01:38 AM2015-04-01T01:38:27+5:302015-04-01T01:38:27+5:30
आपमधील असंतुष्ट नेते प्रशांत भूषण आणि योगेंद्र यादव यांनी भविष्यातील योजनांचे गुपित उघड केले नसले तरी कार्यकर्ते आणि सदिच्छा व्यक्त करणाऱ्यांची
नवी दिल्ली : आपमधील असंतुष्ट नेते प्रशांत भूषण आणि योगेंद्र यादव यांनी भविष्यातील योजनांचे गुपित उघड केले नसले तरी कार्यकर्ते आणि सदिच्छा व्यक्त करणाऱ्यांची संख्या पाहता नवा राजकीय पक्ष स्थापन करण्याची शक्यता नाकारलेली नाही.
सध्याच्या नेतृत्वामुळे विश्वासघात झालेल्यांची भावना सकारात्मक ऊर्जेच्या रूपाने प्रवाहित करण्याची कल्पना समोर आली असून या दोन नेत्यांनी १४ एप्रिल रोजी बोलावलेल्या बैठकीला हजेरी लावणाऱ्या देशभरातील कार्यकर्त्यांशी विस्तृत चर्चा करून भविष्यातील योजना आखली जाईल, असे सूत्रांनी सांगितले.
मला राजकीय पक्षाची गरज वाटत नाही, मात्र कार्यकर्त्यांना काय हवे आणि काय घडते यावर निर्भर असा राजकीय पक्षही राहू शकतो. राजकीय पक्ष स्थापन करण्याऐवजी आत्तापासून मुद्दे आणि चळवळीवर लक्ष केंद्रित केले जावे असे माझे वैयक्तिक मत आहे, असे आपचे प्रशांत भूषण म्हणाले.