PM नरेंद्र मोदींना भुतानचा सर्वोच्च नागरी सन्मान, 'या' कारणासाठी पुरस्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2021 12:42 PM2021-12-17T12:42:42+5:302021-12-17T12:44:42+5:30
पंतप्रधान मोदींनी यापूर्वी अनेक देशांनी सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित केले आहे. आता, भुतानच्या पंतप्रधान कार्यालयाने ट्विट करुन मोदींना भुतानचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्यात येत असल्याची घोषणा केली आहे.
नवी दिल्ली - पंतप्रधाननरेंद्र मोदींनी आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाची आणि स्वत:ची प्रतिमा उंचावली आहे. त्यामुळेच, देश-विदेशात मोदींच्या नावाचा डंका वाजतो. मोदींना पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी लोक गर्दी करतात. मोदींनी अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले असून, त्यात आणखी एका पुरस्काराची भर पडली. भारताचा शेजारी असलेल्या भुतान देशाने पंतप्रधाननरेंद्र मोदींनी त्यांच्या देशातील सर्वोच्च नागरी सन्मान पुरस्कार देण्याची घोषणा केली आहे.
पंतप्रधान मोदींनी यापूर्वी अनेक देशांनी सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित केले आहे. आता, भुतानच्या पंतप्रधान कार्यालयाने ट्विट करुन मोदींना भुतानचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्यात येत असल्याची घोषणा केली आहे. तसेच, आम्हाला हा पुरस्कार घोषित करताना अत्यानंद होत असल्याचेही ट्विटरवरुन म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोना महामारीच्या संकटात आणि त्या अगोदरही भुतान राष्ट्राला केलेली मदत व सहकार्य हे अतुट आहे. त्यामुळे, हा सन्मान तुमचा हक्क असल्याचे भुतानच्या पीएमओ कार्यालयाने म्हटले आहे. भुतानच्या सर्व नागरिकांकडून आपले अभिनंदन, असे ट्विट करत पीएमओने मोदींचा भुतान भेटीचा एक फोटोही शेअर केला आहे.
Bhutan confers the country's highest civilian award - Ngadag Pel gi Khorlo upon Prime Minister Narendra Modi. pic.twitter.com/MDFpOAN8i3
— ANI (@ANI) December 17, 2021
दरम्यान, यापूर्वी सऊदी अरब, अफगानिस्तान, फलिस्तीन, संयुक्त अरब अमिरात, रशिया आणि मालदीव या राष्ट्रांनी आपल्या सर्वोच्च नागरिक पुरस्काराने प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचा सन्मान केला आहे.