८२ मृतदेहांची अद्याप ओळख पटलेली नाही; स्थानिक महापौरांनी दिली महत्त्वाची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2023 07:25 PM2023-06-08T19:25:18+5:302023-06-08T19:25:46+5:30
Odisha Train Tragedy : ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यात २ जून रोजी झालेल्या रेल्वे अपघातात २८८ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.
odisha train accident : ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यात २ जून रोजी झालेल्या रेल्वेअपघातात २८८ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. अद्याप ८२ मृतदेहांची ओळख पटलेली नाही. दरम्यान, सरकारने आर्थिक मदत जाहीर केली आहे, पण अद्याप ८२ मृतदेहांची ओळख पटलेली नाही. स्थानिक महापौरांनी दिलेल्या माहितीनुसार, अद्याप ८२ मृतदेह असे आहेत, ज्यांची ओळख पटू शकली नाही त्यामुळे त्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात दिरंगाई होत आहे.
ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २ लाख रुपयांची भरपाई जाहीर केली. दुसरीकडे, रेल्वे मंत्रालयाने अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना १० लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे.
८२ जणांची अद्याप ओळख पटली नाही
भुवनेश्वरच्या महापौर सुलोचना दास यांनी पीटीआय या वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटले, "अद्याप ८२ जणांची ओळख पटलेली नाही. ओळख पटलेले मृतदेह त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना सुपूर्द करण्यात आले आहेत. तसेच नुकसान भरपाई देखील देण्यात आली आहे."
VIDEO | “82 bodies are yet to be identified. The identified ones have been dispatched (handed over to family members) and compensation has also been disbursed,” says Bhubaneswar Mayor Sulochana Das on #OdishaRailTragedy. pic.twitter.com/bgOxIcBTq8
— Press Trust of India (@PTI_News) June 8, 2023
२८८ जण दगावले
२ जून रोजी संध्याकाळी ७ वाजता बालासोर जिल्ह्यातील रेल्वे स्थानकाजवळ कोरोमंडल एक्सप्रेसचा अपघात झाला. या अपघातात २८८ जणांचा मृत्यू झाला तर १२०० हून अधिक जण जखमी झाले होते. अवघ्या विश्वाच्या डोळ्यात पाणी आणणाऱ्या या रेल्वे अपघातात तब्बल २८८ जणांचा मृत्यू झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील घटनास्थळी जाऊन माहिती घेतली. या दुर्देवी घटनेनंतर ३ जून रोजी ओडिशात एक दिवसाचा राजकीय दुखवटा जाहीर करण्यात आला होता.