गावच्या सगळ्याच मुलींना सायकली भेट, सोनूने विद्यार्थींनींची 15 किमीची पायपीट संपवली
By महेश गलांडे | Published: November 1, 2020 04:15 PM2020-11-01T16:15:54+5:302020-11-01T16:17:49+5:30
सोनू सूद आता रियल लाईफ हिरो बनला आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचणीही तो आवर्जुन जाणून त्यांना मदतीचा हात देत आहे. नुकतेच एका ट्विटर युजर्संने सोनू सूदला टॅग करुन मदत मागितली होती.
मुंबई - अभिनेता सोनू सूदने कोरोना काळात लोकांची भरभरून मदत केली. अजूनही तो जमेल कशी लोकांची मदत करत करतो. अशात काही लोकांना असं वाटतं की समस्या कोणतीही असो त्याचं समाधान करण्यााठी सोनू सूद आहेच. काही प्रमाणात हे खरंही आहे कारण त्याने समजातील वेगवेगळ्या वर्गापर्यंत मदत पोहोचवली. त्याच्यामुळे अनेक लोकांच्या चेहऱ्यावर हसू फुललं. शिक्षण असो वा वैद्यकीय क्षेत्रातील अडचण, घर असो वा घरची परिस्थिती... सोनू सूद लाखो नागरिकांनासाठी रॉबिनहूड बनून कामाला लागला आहे. सोनूच्या कामाचा प्रत्यय सातत्याने समाजासमोर येत आहे. आताही एका आदिवासीबहुल गावातील मुलींना सायकली भेट देऊन त्यांच्या भविष्याा प्रवास सोपा करण्याचं काम सोनूनं केलंय.
सोनू सूद आता रियल लाईफ हिरो बनला आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचणीही तो आवर्जुन जाणून त्यांना मदतीचा हात देत आहे. नुकतेच एका ट्विटर युजर्संने सोनू सूदला टॅग करुन मदत मागितली होती. उत्तर प्रदेशातील सोनभद्रा आणि मिर्झापूर येथील हजारो मुलींना 5 वीनंतरचे शिक्षण सोडून द्यावे लागते. त्यामुळे, संतोष नामक युजर्संने सोनू सूदकडे गावातील 35 मुलींसाठी मदत मागितली. गावातील 35 मुलींना 8 ते 15 किमीचा दररोज पायी प्रवास करावा लागतो. नक्षल प्रभावित प्रदेश असल्यामुळे जंगलातून मुलींना पायपीट करावी लागत आहे. त्यामुळे, या मुलींना जर आपण सायकल दिली तर त्यांच्या भविष्याचा प्रवास सुखकर होईल, असे ट्विटर युजर्संने म्हटले होते.
संतोषच्या या मदतीच्या मागणीची हाक सोनू सूदपर्यंत पोहोचली, त्यावेळी सोनूने या सर्व मुलींना नवीन सायकली घेऊन देण्याचं आश्वासन दिलं. त्यानंतर, दुसऱ्याच दिवशी या मुलींच्या गावात नवीन सायकली पोहोचल्या. एका ट्विटर युजर्संने सोनूच्या या सायकल मदतीचं ट्विट केलंय. सोनूने ते ट्विट रिट्विट करुन आयुष्याची सायकल Cycle of Life असं म्हटलंय.
Cycle of Life.
— sonu sood (@SonuSood) November 1, 2020
Miles to go but the journey is On 🚲 @NeetiGoel2https://t.co/vYE7TCrKua
दरम्यान, सोनू सूदने बऱ्याच महिन्यांनंतर सिनेमाच्या शूटींगला सुरूवात केली आहे. याबाबत त्याने सांगितले की, कोरोना काळात त्याने लोकांची मदत केली याचा प्रभाव सेटवर बघायला मिळतो. लोक आदराने विचारपूस करतात, स्वागत करतात. अनेकजण सेटवर भेटायलाही येत असल्याचे तो बोलला.